Pune Leopard: वनखात्याने बिबट्याला पकडायला सापळा लावला, पण चलाख बिबट्याने बाहेरुनच कोंबडीचं मुंडकं पकडलं
Pune Leopard attack: पुण्यातील शिरुर, आंबेगाव आणि जुन्नर या परिसरात जवळपास 1400 बिबटे आहेत. हे बिबटे ऊसाच्या फडात लपून बसतात. बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावले आहेत.

Pune Leopard: गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात बिबट्यांनी प्रचंड दहशत निर्माण केली आहे. पुण्यातील शिरुर, आंबेगाव आणि जुन्नरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात काही नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर वनखात्याने बिबट्यांना (Leopard News) पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. एका नरभक्षक बिबट्याला ठारही मारण्यात आले होते. तसेच ऊसाच्या फडातून आणि रात्रीच्यावेळी गावातून फिरणाऱ्या बिबट्यांना पकडण्यासाठी वनखात्याने ठिकठिकाणी पिंजरे लावले आहेत. मात्र, जुन्नरमधील (Junnar news) बिबट्यांना आपल्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आल्याचा सुगावा लागला आहे. त्यामुळे हे बिबटे आता पिंजऱ्याच्या बाहेरुनच शिकार करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. (Pune News)
वनविभागाने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी जुन्नरमध्ये पिंजऱ्यांचे सापळे रचले आहेत. शिकारीच्या शोधात असणाऱ्या या बिबट्यांसाठी पिंजऱ्यांमध्ये कोंबड्या ठेवलेल्या असतात. वडगाव आनंद येथील अशाच एका पिंजऱ्याजवळ एक मादी बिबट्या आणि तिचे दोन बछडे आले होते. पिंजऱ्याभोवती त्यांनी घिरट्या घातल्या अन कोंबडीची शिकार करण्याच्या हेतूनं पंजा पिंजऱ्यात घातला. मादी बिबट्याने या झटापटीत कोंबडी ठार झाली. पण वनविभागाच्या या पिंजऱ्यात एक ही बिबटया जेरबंद झाला नाही. त्यामुळं बिबटे आता सावध झालेत की काय? अशी चर्चा यानिमित्ताने रंगली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या दहशतीत आणखी भर पडली आहे.
Badlapur Leopard news: बदलापूरजवळच्या अंबेशिवमध्ये बिबट्याची एन्ट्री
बदलापूरपासून काही अंतरावर असलेल्या अंबेशिवमध्ये बिबट्या आल्याची माहिती समोर आली आहे. या बिबट्याने दोन बकऱ्यांची शिकार केली आहे. एका महिलेने या बिबट्याला पाहिजे. यानंतर या परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश वनधिकारी वैभव वाळिंबे यांनी दिली आहे.
तर अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव मोझरी गावातही बिबट्याचा वावर दिसून आला आहे. अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव मोझरी मध्ये गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा वावर असल्यामुळे या परिसरात प्रचंड भीतीच वातावरण निर्माण झाल आहे, त्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली आहेत. दिवसा आणि रात्री देखील मजूर किंवा शेतकरी शेतात जात नाही. त्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी रात्री वन विभागाने जंगलात पिंजरा लावला आणि या पिंजरामध्ये बकरी देखील टाकण्यात आली. मात्र, अद्याप बिबट्या हाती लागलेला नाही.
View this post on Instagram
आणखी वाचा
























