(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Swiggy News : बॉस लई खास! टीमसाठी केली तब्बल 71 हजार रुपयांची फूड ऑर्डर
बॉसने आपल्या सहकाऱ्यांसाठी तब्बल 71 हजार रुपयांचं जेवण ऑर्डर केल्याचं समोर आलं आहे. फूड डिलिव्हरी अॅप कंपनी "स्विगी" ने जाहीर केलेल्या वार्षिक अहवालातून ही माहिती पुढे आली आहे.
Pune Swiggy News : ऑफिसमधील बॉस आणि कर्मचाऱ्यांमध्ये फार चांगले संबंध नसतात, असे म्हटले जाते. मात्र, या समजेला छेद देणारी काही उदाहरणे आपल्याभोवती दिसून येतात. असेच एक उदाहरण समोर आले आहे.एका बॉसने आपल्या सहकाऱ्यांसाठीतब्बल 71 (swiggy) हजार रुपयांचं जेवण ऑर्डर केल्याचं समोर आलं (Order)आहे. फूड डिलिव्हरी अॅप (food delivery) कंपनी "स्विगी" ने जाहीर केलेल्या वार्षिक अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. सहकाऱ्यांसाठी केलेल्या या ऑर्डरची आता चर्चा सुरू आहे.
पुण्यातील एक कंपनीतील अधिकाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांसाठी तब्बल 71,000 रुपयांचे जेवण मागवलं होतं. यामध्ये बर्गर आणि फ्राईजचा समावेश आहे. त्यांच्या या ऑर्डरची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. पुण्यातील हे बॉस सगळ्यात जास्त किमतीची ऑर्डर देणारा स्विगीचा दुसरा ग्राहक ठरला आहे. यापूर्वी बंगळुरुमधील एका व्यक्तीने एकाच वेळी 75,387 रुपयांच्या जेवणाची ऑर्डर केली होती. ही ऑर्डर त्याने दिवाळी दरम्यान केली होती. याच्या पाठोपाठ पुण्यातील व्यक्तीने त्याच्या टीम साठी 71, 229 रुपयांचे बर्गर आणि फ्राईज मागवले आहे.
> स्विगीच्या वार्षिक अहवालातील काही महत्वाचे मुद्दे
स्विगीने वार्षिक अहवाल जाहीर केला आहे. त्यात वर्षभरात नेमकं लोकांनी काय काय ऑर्डर केलं आणि कंपनीला किती यश मिळालं हे सांगण्यात आलं आहे. अहवालात अनेक आश्चर्यजनक माहिती समोर आली आहे.
- भारतात या वर्षी प्रति मिनिटाला सरासरी 137 बिर्याणी ऑर्डर करण्यात आल्या. बिर्याणीनंतर मसाला डोसा, चिकन फ्राईड राइस, पनीर बटर मसाला, बटर नान, व्हेज फ्राईड राईस, व्हेज बिर्याणी आणि तंदुरी चिकन हे पदार्थ सर्वाधिक मागवले गेले.
- 27 लाख वेळा गुलाबजाम तर 16 लाख वेळा रसमलाईची ऑर्डर केली गेली आहे.
- इटालियन पास्ता, पिझ्झा, मेक्सिकन बाऊल, स्पाईसी रेमन आणि सुशी हे स्विगीवर सर्वाधिक ऑर्डर केलेले विदेशी पदार्थ आहे.
- समोसा, पॉपकॉर्न, पावभाजी, फ्रेंच फ्राईज, गार्लिक ब्रेडस्टिक्स, हॉट विंग्स, टॅको, क्लासिक स्टफ्ड गार्लिक ब्रेड, हे स्विगीवर सर्वाधिक ऑर्डर केलेले टॉप 10 स्नॅक्स आहेत.
- गुलाब जामुन, रसमलाई, चोको लावा केक, रसगुल्ला, चोकोचिप्स आईस्क्रीम, अल्फोन्सो मॅंगो आईस्क्रीम, काजू कतली, टेंडर कोकोनट आईस्क्रीम, डेथ बाय चॉकलेट, हॉट चॉकलेट फज हे सर्वाधिक ऑर्डर केलेले गोड पदार्थ आहेत.