(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Supriya Sule : जास्त दिवस सहन करणार नाही, उद्रेक होऊ देऊ नका; आई अन् नणंदेवर टीका केल्याने सुप्रिया सुळे संतापल्या
काश्मीर ते कन्याकुमारी पक्ष आहे त्यांना एक उमेदवार मिळत नाही. आमच्या घरात उमेदवारी दिली. आमचं घर फोडत निर्णय घेतला. बदल तिकडे हाजी करून होणार नाही. मी तुमच्यासाठी लढणार असल्याचे त्या म्हणाल्या.
Supriya Sule : आमच्या घरातील गोष्टी रोज टीव्हीवर दिसतात, अनेक प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे आहेत पण देणार नाही. अनेक महिने झालं सहन करत आहे, आता जास्त दिवस सहन करणार नाही, उद्रेक होऊ देऊ नका. माझ्या आणि रोहितच्या आईवर दोनवेळा बोलला ठीक आहे, तिसऱ्या वेळी बोलला, तर करारा जवाब मिलेगा, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. सुप्रिया सुळे आई आणि नणंदेवर झालेल्या टीकेनंतर संतापल्या आहेत.
आमच्या खानदानाचे वाभाडे निघतील ते मी होऊ देणार नाही
काश्मीर ते कन्याकुमारी पक्ष आहे त्यांना एक उमेदवार मिळत नाही. आमच्या घरात उमेदवारी दिली. आमचं घर फोडत निर्णय घेतला. बदल तिकडे हाजी करून होणार नाही. मी तुमच्यासाठी लढणार असल्याचे त्या म्हणाल्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमच्या खानदानाचे वाभाडे निघतील ते मी होऊ देणार नाही. बारामती म्हणजे शरद पवार असून दुसऱ्यांनी गैरसमज करू नये हे सगळं आमच्यामुळे आहे. विकास सगळ्यांच्या मदतीने होतं असते. कामे फक्त सत्तेतून होतात असे सांगितले, 10 वर्ष विरोधात खासदार आहे अनेक प्रकल्पात देशात बारामतीचा पहिला नंबर लागतो. वाराणसीपेक्षा बारामती सगळ्यात पुढं आहे, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला.
तरी गुजरातमध्ये गुजरात शायनिंग झालं की नाही?
त्या पुढे म्हणाल्या की, लोकं म्हणतात एका विचाराचा खासदार पाहिजे. केंद्रात काँग्रेस सरकार होतं तरी गुजरातमध्ये गुजरात शायनिंग झालं की नाही? विरोधात असले तरी कामे करता येतात. लोकांशी चांगले वागलं की कामे होतात. विरोधी पक्षात आल्यापासून जास्त टाळ्या आता मिळतात. माझा बाप थकला नाही श्रमलेला आहे. सुखाच्या काळात सोबत राहिलो तर रोहित आईसाठी करतोय तसा मुलगा माझा करेल असं माझी आशा आहे, माझी मुलगी गुणी आहे.
सुप्रिया यांनी सांगितले की, शरद पवार कृषी मंत्री असते तर कांदा, दूध दर मिळाला असता. शेतकरी कर्जमाफी झाली असती. 2014 मध्ये आमची आई म्हणायची तुमचे सरकार येत नाही आणि खरंच सरकार नाही आलं. आमच्या आईची आता कटकट वाढली आहे. आता ती म्हणते आता सरकार जाईल, महागाई वाढली आहे. आपण बुथवर सिलेंडर ठेवू, आपण नमस्कार करून जाऊ. हे म्हणतात विकासासाठी मत द्या, अरे कुणाचा विकास झाला? विकास तर यांचा झाला.
इतर महत्वाच्या बातम्या