Ravindra Dhangekar : धंगेकरांच्या 'त्या' चॅलेंजची आजही होतेय चर्चा, काय होतं ते चॅलेंज?
Ravindra Dhangekar : 2019 च्या निवडणुकीत कोणीही हे चॅलेंज पूर्ण करु शकलं नव्हतं.
Ravindra Dhangekar : नेते मंडळी म्हटलं की साधारण (Pune Bypoll Election) पांढरी किंवा काळी आलिशान कार, पांढरे चकचकीत कपडे, काळे पॉलिश केलेले बुट आणि आजुबाजूला दहा-पंधरा कार्यकर्ते असं चित्र आपल्या समोर उभं राहतं. महाराष्ट्रातील नेत्यांंचं बघितलं तर अनेक नेतेमंडळी याच पोशाखात दिसतात. सध्या पुण्यातदेखील अशाच पोशाखातील अनेक नेते पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या मैदानात उतरलेले दिसत आहेत. धुमधडाक्यात प्रचारही करताना दिसत आहेत. मात्र काही वर्षांपूर्वी कसब्याचं चित्र वेगळं होतं.
कसब्याचे किंगमेकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश बापटांनी मागील अनेक वर्ष कसब्या सत्ता गाजवली. त्यांचाही पेहराव काहीसा असाच असायचा. यंदा भाजपकडून उमेदवारी मिळालेले हेमंत रासने यांचाही पेहराव आणि राहणीमान असंच आहे. मात्र ज्या उमेदवारांना मागे टाकण्यासाठी भाजपची अख्खी फोज पुण्यात आली आहे. जय्यत तयारीला लागली आहे. त्या रविंद्र धंगेकरांबाबत काहीसं उलट चित्र काही वर्षांपूर्वी बघायला मिळत होतं.
धंगेकरांचं चॅलेंज काय होत?
रविंद्र धंगेकर यांनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहे. त्यांनी खासदार गिरीश बापट यांच्या विरोधातही निवडणूक लढवली आहे. त्यावेळी बापट जिंकले मात्र धंगेकर काहीच मतांनी पराभूत झाले होते. या सगळ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी धंगेकरांच्या कार्यकर्त्यांनी एक चॅलेंज दिलं होतं. मात्र त्यावेळी त्यांचं ते चॅलेंज अनेकांनी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोणीही ते पूर्ण करु शकले नाही. ते चॅलेंज होतं की 'कारमध्ये धंगरेकरांना बघा आणि हजार रुपये मिळवा'. धंगेकर यांची ओळख सर्वसामान्यांचे नेता अशी कसबेकर करुन देतात. कसबेकरांनी त्यांचा कार्यकर्ता ते नेता असा प्रवास जवळून पाहिला आहे.
या चॅलेंजबाबत धंगेकरांना विचारलं असता धंगेकर म्हणाले, मागील 25 वर्षांपासून मी कसबा मतदार संघात नगरसेवक म्हणून काम करत आहे. त्यामुळे कसबेकरांसोबत माझी नाळ जुळली आहे. 'कारमध्ये धंगरेकरांना बघा आणि हजार रुपये मिळवा', अशी लोकं चर्चा करतात. मात्र मला वाटतं की दुचाकीवर फिरल्यानंतर सर्वसामान्यांना आपला चेहरा दिसतो. आपण त्यांना त्यांच्यातले वाटू लागतो. त्यानंतर परिसराची पाहणी करता येते आणि नागरिकांच्या समस्याच नाही तर गाऱ्हाणंदेखील ऐकून घेता येतात. त्यामुळे जर जिंकलो तर कसब्यात आमदार म्हणून नाही तर लोकनेता आणि कार्यकर्ता म्हणून काम करेन, असं ते म्हणाले. आता त्यांच्याकडे कार आहे मात्र त्यांची सर्वसामान्यांचा नेता ही ओळख पुसली गेली नाही आहे.