Pune Polling Day : कुठे आंबे तर कुठे निम्या किंमतीत आईस्क्रिम; मतदार पुणेकरांसाठी आज भन्नाट ऑफर
मतदानाचा टक्का वाढावा यासाठी पुण्यात विविध ठिकाणी वेगवेगळे ऑफर्स ठेवण्यात आले आहे.
पुणे : मतदानाचा टक्का वाढावा यासाठी (Pune Votting Election) पुण्यात विविध ठिकाणी वेगवेगळे ऑफर्स ठेवण्यात आले आहे. कोणीत निम्या किंमतीत आयस्क्रिम देत आहेत. तर कुणी फळांचा राजा असलेल्या आंब्यांवर खास ऑफर देत आहे. त्यासोबतच पुणेकरांना आज स्विगी डाईन आऊटवरदेखील ऑफर मिळणार आहे. मतदान करण्यासाठी अनेक नागरिकांनी पुढे येऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी हे सगळे ऑफर्स ठेवण्यात आले आहेत.
पुण्यातील देसाई बंधू आंबेवाले पुढे आले आहेत. आंबा प्रेमींसाठी देसाई बंधू यांनी एक खास ऑफर ठेवलेली आहे. 700 रुपये डझनाचा आंबा तीनशे रुपयांनी मतदान केल्याची शाई दाखवून मिळणार आहेत. सकाळी 11 ते 6 वाजेपर्यत ही ऑफर असणार आहे.
निम्म्या किंमतीत आईस्क्रिम
त्यासोबतच पुण्यात मतदान केलेले बोट दाखवले की अर्ध्या किमतीत आईसक्रीम मिळणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडणाऱ्या मतदारांचे कौतुक व्हावे, या हेतूने मतदान करणाऱ्या पुणेकर मतदाराना निम्म्या किमतीत पॉट आईस्क्रीम चा कप देण्यात येणार आहे. पुण्यातील प्रभात रस्त्यावर शिरीष ट्रेडर्सचे संस्थापक शिरीष बोधनी यांनी हा निर्णय घेतला आहे. सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यतच हे आईस्क्रीम मिळणार आहेत. पुण्यात प्रसिद्ध असलेले लाकडी पॉट मध्ये केलेले आईस्क्रीम हे उन्हाळ्यात आकर्षण असते. कमला नेहरू पार्क दत्त मंदिराजवळ (प्रभात रस्ता)येथे शिरीष बोधनी हा व्यवसाय करतात.त्यांचे पॉट आइसक्रीम ४० वर्षाहून अधिक काळ प्रसिद्ध आहे.मतदानाची टक्केवारी वाढावी आणि लोकशाहीचे कर्तव्य बजावणाऱ्या मतदारांचे कौतुक व्हावे,यासाठी सोमवार,दि.१३ मे रोजी मतदानाच्या दिवशी सकाळी ९ ते दुपारी १२ या कालावधीत मतदान करून आलेल्या मतदाराला आईस्क्रीम कप निम्म्या किमतीत देण्याचा उपक्रम त्यांनी जाहीर केला होता.
swiggy कडून ऑफर
मतदानाची टक्केवारी वाढावी आणि अधिक लोकांनी मतदान करावं, यासाठी स्विगीकडून खास ऑफर देण्यात आली आहे. स्विगी डाइनआऊटची पुण्यात मतदानाच्या दिवशी आकर्षक डायनिंग ऑफर देणार आहेत. मतदारांनी त्यांचं शाई लावलेलं बोट दाखवलं तर त्यांना स्विगी डाईन आऊटवर 50 टक्क्यांची सूट मिळणार आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि निवडणूक प्रक्रियेत भाग घ्यावा हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
इतर महत्वाची बातमी-