एक्स्प्लोर

Tanaji Sawant Son: तानाजी सावंतांचा मुलगा घरच्यांना न सांगता बँकॉकला का गेला? पुणे पोलिसांनी ऋषिराजचा जबाब नोंदवला

Tanaji Sawant Son: तानाजी सावंत आणि त्यांच्या मुलात काही वाद झाला होता का, अशी शंका उपस्थित झाली होती. मात्र, तानाजी सावंत यांनी आपल्यात सर्व आलबेल असल्याचे स्पष्ट केले होते.

पुणे: राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांचे अपहरण झाल्याच्या वृत्ताने सोमवारी एकच खळबळ उडाली होती. मात्र, प्रत्यक्षात ऋषिराज सावंत हा मित्रांसोबत बँकॉकला गेल्याचे तपासात समोर आले होते. ऋषिराज सावंत सोमवारी दुपारी पुण्यातील लोहगाव विमानतळावरुन चार्टर्ड प्लेनने बँकॉकला गेला होता. मात्र, त्याचे अपहरण झाल्याची माहिती पसरताच हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून अंदमान-निकोबारपर्यंत गेलेले ऋषिराज सावंत यांचे विमान माघारी वळवण्यात आले. हे चार्टर्ड प्लेन रात्री साडेदहाच्या सुमारास लोहगाव विमानतळावर उतरले. त्यानंतर पुणे पोलिसांनी विमानतळावरच ऋषिराज सावंत याचा जबाब नोंदवून घेतला. 

 ऋषिराज सावंत खरंच घरी न सांगता बँकॉकच्या दिशेने निघाले होते का? तानाजी सावंत यांना त्यांचा मुलगा बँकॉकला गेलाय हे माहिती होतं का?, या प्रश्नांची उत्तरं पोलिसांकडून शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. पोलिसांनी आता याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे. त्यामध्ये ऋषिराज सावंत यांनी बँकॉकला जाण्यासाठी चार्टर्ड विमानाचे 68 लाख रुपये ऑनलाईन भरल्याची माहिती समोर आली आहे. ऋषिराज सावंत बँकॉकला रवाना झाल्यानंतर पुणे पोलिसांना त्यांचे अपहरण झाल्याचा निनावी फोन आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर तानाजी सावंत आपल्या मोठ्या मुलासह पुणे पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचले होते. नेमक्या कुठल्या कारणावरून तानाजी सावंत यांनी मुलाच्या अपहरणाची तक्रार दिली, याचा तपाससुद्धा पोलिसांकडून होण्याची शक्यता आहे.

नेमकं काय घडलं?

तानाजी सावंत यांचा मुलगा कात्रज येथील कार्यालयातून संध्याकाळी पाचच्या सुमारास एका कारने दोन मित्रांसमवेत लोहगाव विमानतळावर गेले. त्यांना तिथे सोडून चालक कात्रजच्या कार्यालयात परतला. त्याने याबाबत तानाजी सावंतांना माहिती दिली. ऋषिराज  कोणालाही न सांगता विमानतळावर गेल्याचे समजताच तानाजी सावंत आणि त्यांचे कुटुंबीय धास्तावले. तानाजी सावंतांनी याबाबत तातडीने पुणे पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवर तातडीने नाकाबंदी केली. लोहगाव विमानतळासह सर्व महत्त्वाच्या ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. यादरम्यान पोलिसांकडून रस्त्यावरील वाहनांचीही तपासणी सुरु होती. 

पुणे पोलिसांनी लोहगाव विमानतळावरुन रवाना झालेल्या प्रवाशांच्या याद्या तपासल्या. तसेच विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले. त्यावेळी ऋषिराज सावंत आपल्या मित्रांसह चार्टर्ड प्लेनमध्ये बसून बँकॉकला रवाना झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणात आता पोलीस ऋषिराज सावंतची पुन्हा चौकशी करणार का?  या चौकशीतून काय समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा

8 दिवसांपूर्वी दुबईवारी, आता 68 लाखांचं बिल, पप्पा रागावतील म्हणून.... तानाजी सावंतांच्या लेकाची इनसाईड स्टोरी

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
Director Rob Reiner Wife Murder Case: सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Embed widget