Pune News: पुणेकरांंच्या सेवेसाठी पोलीस सज्ज! 112 हेल्पलाईन क्रमांकासाठी मॉडर्न कंट्रोल रुम; नागरिकांना मिळणार तात्काळ मदत
आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ पोलीस मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्यात ‘112’ टोल फ्री हेल्पलाइन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
![Pune News: पुणेकरांंच्या सेवेसाठी पोलीस सज्ज! 112 हेल्पलाईन क्रमांकासाठी मॉडर्न कंट्रोल रुम; नागरिकांना मिळणार तात्काळ मदत Pune Police Gets Modern Control Room For 112 Helpline, 157 Police Vehicles For Quick Response Pune News: पुणेकरांंच्या सेवेसाठी पोलीस सज्ज! 112 हेल्पलाईन क्रमांकासाठी मॉडर्न कंट्रोल रुम; नागरिकांना मिळणार तात्काळ मदत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/29/2b4ce2ab9bac1f6d1cd5bab7467d72ff_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune News: आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ पोलीस मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्यात ‘112’ टोल फ्री हेल्पलाइन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोलिस आयुक्तालयातील पोलिस नियंत्रण कक्षाचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या प्रकल्पांतर्गत नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी पोलीस विभागाच्या 157 वाहनांवर एमडीटी यंत्रणा बसविण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी तातडीने पोलिसांची मदत केली जाईल, असे पोलिस आयुक्त गुप्ता यांनी सांगितले.
'112' या एकाच हेल्पलाईनवरून आता पुणेकरांना सर्व प्रकारची मदत मिळणार आहे. पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमनदल आणि महिला हेल्पलाईनची एकत्रित मदत उपलब्ध करून दिली आहे. जीपीएसच्या यंत्रणेच्या साह्याने एका ठिकाणी फोन लावल्यावर अवघ्या काही सेकंदात हा फोन कोणत्या स्थळावरुन आला आहे, हे संबंधितांना समजणार आहे.
आतापर्यंत घडलेल्या अनेक घटनांचं गांभीर्य लक्षात घेतला. पोलिस नियंत्रण कक्ष, अग्निशमनदल, रुग्णवाहिका, महिला हेल्पलाईन, चाइल्ड हेल्पलाईन या सगळ्यांना आता एकाच नंबरवर सगळ्याप्रकारची मदत मिळणार आहे. घडलेल्या घटनेच्या आवश्यकतेनुसार यंत्रणा घटनास्थळी दाखल होईल.
कशी असेल ही सेवा
112 हा आपत्कालीन नंबर अमेरिकेच्या 911 या हेल्पलाईन नंबरसारखा आहे. इमरजेंसी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टम (ERSS)यांच्या अंतर्गत ही हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे. यापुर्वी आपल्या पोलीसांच्या मदतीसाठी 100 नंबर, महिला हेल्पलाईनसाठी 1091 आणि चाईल्ड हेल्पलाईनसाठी 1098 हे नंबर उपलब्ध होते. 112 या नंबरवरुन मदत मागितल्यास घटनास्थळाजवळ गस्त घालणाऱ्या जीपीएस यंत्रणेवर त्यांची माहिती जाईल. याद्वारे तक्रारदाराला कमीत कमी वेळात मदत केली जाईल
अनेक अडचणी होणार दूर
100 नंबर असताना पोलीसांना आणि नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. कॉल नेमका कोणत्या तक्रारीसाठी आला?, याबाबत अनेकदा शंका असायची. कधी तक्रारदाराकडून चुकीची माहितीसुद्धा देण्यात येत होती. आता मात्र त्या अडचणींना नागरिकांना किंवा पोलीसांना सामोरे जावे लागणार नाही, त्यामुळे कमीत कमी वेळात मदत करणे शक्य होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)