एक्स्प्लोर
चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या, पुण्यात तरुणाला बेड्या

पुणे : पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन एकाने आपल्या पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पूजा स्वप्नील भडवळे असं मृत तरुणीचं नाव असून पती स्वप्नील भडवळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सिंहगड परिसरात धायरीमध्ये संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एका तरुणीच्या अंगावर धारदार शस्त्राने वार करुन राहत्या घरी हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. चारित्र्याच्या संशयावरुन हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पूजाचं सहा महिन्यांपूर्वीच स्वप्नीलशी लग्न झालं होतं. घरी कोणी नसताना धारदार शस्त्राने तिच्या हात आणि मानेवर वार करुन तिला मारण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
महाराष्ट्र
महाराष्ट्र























