एक्स्प्लोर

Pune Bypoll Election : देवेंद्र फडणवीस दिल्लीतून थेट पुण्यात; पोटनिडणुकीसंदर्भात आज उमेदवार घोषित होण्याची शक्यता

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीहून थेट पुण्यात येणार आहेत. पुण्यातील कसबा पेठ  आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवार घोषित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Pune Bypoll Election : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) हे आज दिल्लीहून थेट पुण्यात येणार आहेत. पुण्यातील कसबा पेठ  (Kasba By-Election)  आणि चिंचवड  (Chinchwad By-Election)  या दोन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवार घोषित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन्ही मतदार संघासासाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्यापासून उमेदवारी कोणाला मिळणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  दरम्यान या दोन्ही पोटनिवडणुकांसाठी इच्छुकांची नावे केंद्रीय समितीकडे पाठवण्यात आल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. 

कसबा पेठ विधानसभेसेठी पुणे भाजपकडून पाच नावे प्रदेश समितीकडे पाठवण्यात आली आहेत. ज्यामध्ये मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक, मुलगा कुणाल टिळक, गणेश बिडकर, हेमंत रासने आणि धीरज घाटे यांच्या नावांचा समावेश आहे. या पाचपैकी तीन नावे केंद्रीय समितीकडे पाठवण्यात येणार आहेत. 26 फेब्रुवारीला या दोन्ही मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. तर 2 मार्चला निकाल लागणार आहे.

बैठकांचं सत्र सुरुच

पोटनिवडणुका जाहीर झाल्यापासून उमेदवारी कोणाला मिळेल?, याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्यात भाजपकडे इच्छुकांची मोठी यादी आहे. चिंचवड आणि कसबा मतदार संघासाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी आतापर्यंत भाजपने तीन बैठका घेतल्या आहे. या तिन्ही बैठकांमधून इच्छुक उमेदवारांची नावं समोर आली आहे. त्यातील नावं प्रदेश समितीकडे पाठवण्यात आली आहे. कसबा भाजपचा पारंपारिक मतदार संघ असल्याने इच्छुकांची मोठी यादी आहे. त्यात आमदार मुक्ता टिळकांच्या कुटुंबियांपैकी एकाला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. 

25 फेब्रुवारीला भाजपने चिंचवड मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. त्यात उमेदवार जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र या बैठकीत भाजपची राजकीय रणनिती ठरली.  या बैठकीला आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू लक्ष्मण जगताप, पत्नी अश्विनी जगताप, मुरलीधर मोहोळ, आमदार महेश लांडगे यांच्यासह चिंचवडचे स्थानिक भाजपनेते उपस्थित होते. या सगळ्या पोटनिवडणुकीची जबाबदारी आमदार महेश लांडगे, माधुरी मिसाळ आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

आज उमेदवार ठरणार का?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट दिल्लीतून पुण्यात येणार आहे. पुण्यातील एका कार्यक्रमासाठी ते पुण्यात येणार आहे. त्यावेळी ते भाजपच्या नेत्यांनादेखील भेटणार आहे. त्यामुळे आज नेमका उमेदवार निश्चित होणार का? याकडे लक्ष लागलं आहे. मात्र 1 किंवा 2 तारखेला उमेदवार निश्चित होणार असं सांगण्यात आलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Embed widget