एक्स्प्लोर
आईच्या निधनामुळे पुण्यात 26 वर्षीय तरुणीची आत्महत्या
पुणे : आईच्या निधनामुळे आलेल्या नैराश्यातून 26 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्यातील बावधन भागात हा प्रकार उघडकीस आला. मोनिका शर्मा असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे.
मोनिका ही बावधन येथील एका खासगी कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरी करत होती. मूळची मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रहिवासी असलेली मोनिका बावधनमध्ये एकटीच राहत होती. काही दिवसांपूर्वी तिच्या आईचे अकाली निधन झाले. आईच्या निधनानंतर तिचे वडील काही दिवस तिच्यासोबत राहत होते. दहा दिवसांपूर्वी ते मध्यप्रदेशला गेले होते.
मंगळवारी मोनिका ऑफिसला न जाता दिवसभर घरीच राहिली. त्यानंतर तिने राहत्या घरातील फॅनच्या हुकला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री साडेआठ-नऊच्या सुमारास मोनिकाचा मित्र तिच्या घरी आला. त्याने दरवाजा ठोठावला, मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा तोडला असता मोनिका गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
मोनिकाने सुसाईड नोट लिहिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आईच्या निधनामुळे आपल्याला नैराश्य आले असून त्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं मोनिकाने लिहिलं आहे. हिंजवडी पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement