Pune Crime News : शेतात अन् अंगणातच लावला अफू; 1 हजार 226 झाडे पोलिसांकडून जप्त
शिक्रापूर येथील तळेगाव रस्त्यालगत महालक्ष्मीनगर परिसरात शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी (दि. २३) टाकलेल्या छाप्यात अफूची तब्बल 1 हजार 226 झाडे जप्त केली.
पुणे : पुण्यात अफुच्या शेतीचं प्रमाण वाढत असल्याचं (Pune crime) मागील काही महिन्यांमध्ये (opium poppies) करण्यात आलेल्या कारवायांवरुन समोर आलं आहे. त्यातच शिक्रापूर येथील तळेगाव रस्त्यालगत महालक्ष्मीनगर परिसरात शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी (दि. २३) टाकलेल्या छाप्यात अफूची तब्बल 1 हजार 226 झाडे जप्त केली तसेच अफूची लागवड करणाऱ्या एका पुरुषासह एका महिलेवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली सुशील शिवाजीराव ढमढेरे (वय 38) व सत्यभामा सुरेश थोरात (वय 55, रा. महालक्ष्मीनगर, शिक्रापूर,ता. शिरूर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील महालक्ष्मीनगर परिसरात एका शेतकऱ्यान शेतात, तर एका महिलेने घराशेजारी मोकळ्या जागेत अफूच्या झाडांची लागवड केल्याची माहिती पोलिसांना यांना मिळाली. या वेळी सुशील ढमढेरे याने त्याच्या शेतातील लसणाच्या वाफ्यामध्ये अफूच्या झाडांची लागवड केल्याचे दिसले. दरम्यान, पोलिसांनी येथील अफूची 66 झाडे जप्त केली.
अफुची शेतीवर कडक कारवाई
काही महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सुपे येथे अफूची शेती करण्याऱ्यावर कारवाई करण्यात आली होती. अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये कारवाई केली होती. पोलिसांनी कारवाई करून अफूची बोंडे जप्त केली. अफुच्या बोंड्यांचं एकूण वजन 33 किलो 200 ग्रॅम अफू मिळाला. त्याची किंमत प्रति किलो 2000 रुपये दराने 44 हजार 400 रुपये आहे. मयूर उत्तम झेंडे असे शेतकऱ्याचं नाव आहे. पोलिसांना या अफुच्या शेतीची माहिती मिळताच पोलिसांनी पाहणी सुरु केली होती. रात्रीपर्यंत पोलीस शोध घेत होते. मक्याच्या पिकात शेतकऱ्याने अफुची लागवड केल्याचं समोर आलं होतं.
अफुची शेती करणं महाराष्ट्रात बेकायदेशीर
अफुची शेती करणं महाराष्ट्रात बेकायदेशीर आहे. तरीही अनेक शेतकरी अमली पदार्थांची शेती करताना दिसता. पैशासाठी हा शेतकऱ्याचा खेळ सुरु असतो. मात्र याचा पोलिसांना सुगावा लागला की शेतकऱ्यांवर कारवाई होते. अफुच नाही तर गांजाची लागवड केल्याचेदेखील प्रकार अनेकदा समोर आले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध परिसरातील शेतकऱ्यांवर अफुची किंवा इतर अमली पदार्थाची लागवड केल्याने कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या विशेष पथकाकडून अशा शेतकऱ्यांवर नजर देखील ठेवण्यात येते.
इतर महत्वाची बातमी-
- Pune Metro : पुणे मेट्रो प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; विद्यार्थ्यांसाठी दोन मोठे बदल
- Pune Crime News : पुण्यातील तरुणाई नशेत तुल्ल; पिट्या भाईंनी समोर आणला राज्याला हादरवणारा व्हिडीओ...