Pune crime news : ट्रिपल सीट असताना अडवल्याचा राग; आर्मी जवानाने थेट पोलिसाच्या डोक्यात घातला सिमेंट ब्लॉक, दगडूशेठ मंदिर परिसरातील थरार
वाहतुकीचे नियमन करत असताना बाचाबाची झाली होती त्याचा राग मनात दीड महिन्यानंतर काल रात्री (25 ऑक्टोबर) ठेवून आर्मी जवानाने पोलिसाच्या डोक्यात घातला सिमेंट ब्लॉक घातल्याची घटना घडली आहे.
पुणे : वाहतूक (Pune Crime News) नियमन करत असताना दीड महिन्यांपूर्वी पोलीस आणि आर्मी जवानाची बाचाबाची झाली होती. त्याचा राग मनात ठेवून काल रात्री (25 ऑक्टोबर) आर्मी जवानाने पोलिसाच्या डोक्यात घातला सिमेंट ब्लॉक घातल्याची घटना घडली. यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ घडली. रमेश ढावरे असं पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे तर वैभव संभाजी मनगटे असं आर्मी जवानाचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
दीड महिन्यांपूर्वी वाहतुकीचे नियमन करत असताना पोलिस अंमलदार यांनी Pune Traffic Police) ट्रिपल जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केल्याने बाचाबाची झाली होती. कारवाई केल्याचा राग मनात धरून पोलीस अंमलदाराच्या डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी केले. ढावरे यांनी दीड महिन्यापूर्वी आरोपीवर दंडाची कारवाई केली होती. ट्रिपल सिट गाडी चालवल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आरोपी वैभव मनगटे याने बाचाबाचीचा राग मनात धरुन त्याने बदला घेण्याच्या उद्देशाने रमेश ढावरे यांचा शोध घेतला. बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ढावरे हे बुधवार चौकात वाहतुकीचे नियमन करत होते. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आला. त्याने ढावरे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने सिमेंटचा ब्लॉक ढारे यांच्या डोक्यात जोरात मारला. यामध्ये ढावरे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
वर्दीची भीतीच नाही...
काही दिवसांपूर्वी पुण्यात महिला पोलिसांला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. अश्लील शिवीगाळ करुन महिला पोलिसाला चपलेने मारहाण करण्यात आली होता. माझी गाडी का उचलली, याचा जाब विचारत त्या महिला पोलिसाला जबर मारहाण करण्यात होती. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी मारहाण करणाऱ्या महिलेला अटक केली होती. या प्रकरणी महिला पोलिसाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार महिलेला अटक करण्यात आलं होतं. सीता रमेश पुजारी (वय 35 वर्षे, रा. ताडीवाला रोड) असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे. वाहतूक पोलिसांनी एका महिलेची गाडी उचलली होती. अलका टॉकिज परिसरात हा प्रकार घडला होता. माझी गाडी का उचलली असा जाब त्या महिलेने पोलीस महिलेला विचारला होता. त्यावेळी पोलीस महिलेने माझी पोस्टिंग या परिसरात नाही त्यामुळे मला याबाबत माहिती नाही," असं उत्तर दिलं होतं. यावरुन दोघींमध्ये वाद झाला आणि चपलेने मारहाण केली, अशी माहिती पोलिसांनी दिली होती.
इतर महत्वाची बातमी-