एक्स्प्लोर
चितळे श्रीखंड, दहीभात खाणाऱ्या पुण्यातल्या मांजराला मारहाण
पुणे : तेजस... तन्मय... मयुरी... ही नावं आहेत मांजरांची... या मांजरांना चितळ्यांचंच श्रीखंड लागतं... दह्याशिवाय ती भाताला तोंड लावत नाहीत.. पुण्यातल्या सदाशिवपेठेतलं नावडीकरांचं घर हे त्यांचं हक्काचं घर... पण घरातल्या सात मांजरांपैकी तेजस या बोक्यावर तळमजल्यावर राहणाऱ्या खासदार वंदना चव्हाणांची वक्रदृष्टी पडली... वंदना चव्हाण यांच्या कुटुंबियांनी मांजरांना मारहाण केल्याचा आरोप सरांनी केला आहे.
प्रकरण इथंच थांबलं नाही. नावडीकर सर पोलिसात गेले. आता रितसर तक्रार झाल्यानतर वंदना चव्हाण यांनीही आरोपांना उत्तर दिलं आहे. नावडीकरांनी सातच नाही, तर पन्नास मांजरे पाळावीत. पण त्याचा इतरांना त्रास होऊ नये, असा युक्तीवाद त्या करतात.
वंदना चव्हाण यांनी मांजरांचा बंदोबस्त करण्यासाठी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु बंदोबस्त झाला नाही. एक दिवस एक मांजर त्यांच्या घरात शिरलं असता, त्या मांजराला सळईने मारहाण करण्यात आली. त्यामुळे नावडीकर चिडले.
मांजर अपंग झाल्याचा आरोप करत त्यांनी न्यायालयात खटला दाखल केला. दोन वर्षे खटला चालवला. आता न्यायालयाकडून चव्हाणांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
वंदना चव्हाण, त्यांचे पती आणि घरातील इतरांविरुद्ध खटला सुरु आहे. मांजराला वंदना चव्हाण यांनी मारलं की त्यांच्या घरातील इतर कोणी, हे माहीत नाही, परंतु हा खटला संपूर्ण चव्हाण कुटुंबीयांविरोधात आहे.
भूतदया असणं चांगली गोष्ट आहे, पण प्राणीप्रेमींनी त्याचा इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यायलाच हवी. ज्यांना त्यात रस नाही, त्यांनी त्यांचा तिटकाराही करु नये. कारण कुणीही कुणाच्या ताटाखालचं मांजर नसतं.
संबंधित बातम्या :
मांजराला मारहाण, राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाणांना नोटीस
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
राजकारण
पुणे
Advertisement