एक्स्प्लोर

Pune ATS Raid : पहाटे पुण्यात ATS ची कारवाई; पुण्यातील कोंढवा आणि मोमीनपुरा परिसरात छापा, तिघे ताब्यात

राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यातील कोंढवा परिसरात आणि मोमीनपुरा परिसरात छापा टाकण्यात आला आहे. त्यात पुण्यातून तीन जणांना ताब्यात घेतलं आहे.

पुणे : राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य दहशतवाद (Pune Terrorist Case) विरोधी पथकाकडून पुण्यातील कोंढवा परिसरात आणि मोमीनपुरा परिसरात छापा टाकण्यात आला. पुण्यातून तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने पहाटेपासून 44 विविध ठिकाणी छापेमारी केली. ईसीस दहशतवादी संघटनेशी संबधित तब्बल 15 दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ठाणे जिल्ह्यातील पडघा, बोरीवली शहापूर, मिरा रोड, भिवंडी, कल्याण या ठिकाणी एनआयए आणि एटीएसची पहाटेपासून छापेमारी सुरु आहे.

44 ठिकाणी करण्यात आलेल्या छापेमारीत हसीब मुल्ला, मुसाफ मुल्ला, रेहन सुसे, फरहान सुसे, फिरोज कुवारी, आदिल खोत, मुखलीस नाचन , सैफ आतिक नाचन, याह्या खोत, राफील नाचन, राजील नाचन, शदुब दिवकर, कासिम बेलोरे, मुंजीर केपी या दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या पकडलेल्या दहशतवाद्यांकडून मोबाईल फोन , धारदार शस्त्र, तलवारी आक्षेपार्य साहित्य, पॅलेस्टाईनचा झेंडा, हार्ड डीस्क जप्त करणयात आले आहे.

18 जुलैला पुण्यातील कोथरूड परिसरात पुणे पोलिसांनी मध्यरात्री पेट्रोलिंग करत असताना मध्यरात्री इमरान खान आणि मोहम्मद साकी या दोन दहशतवाद्यांना पकडलं होतं. त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर झालेल्या पोलीस तपासात दहशतवाद्यांची पुढची लिंक उघडकीस आली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात यापूर्वी काही दहशतवादी सापडले होते. त्यांच्याकडे बॉम्ब बनवण्याचं साहित्य सापडलं होतं. शिवाय त्यांनी पुणे जिल्ह्यातील काही जंगलात जावून बॉम्ब टेस्टिंग केल्याचंदेखील समोर आलं होतं.

यापूर्वी पुण्यात NIA आणि ATS च्या छापेमारीत पकडण्यात आलेले सगळे दहशतवादी हे पुण्यातील कोंढवा परिसरात राहत असल्याचं समोर आलं होतं. या दहशतवाद्यांना पुण्यातील कोंढवा परिसरातूनच वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतलं होतं. या कोंढव्यात दहशतवाद्यांनी त्यांचा अड्डा बनवल्याचंदेखील समोर आलं होतं. ते राहत असलेल्या ठिकाणी बॉम्ब बनवण्याचं साहित्य सापडलं होतं शिवाय बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया लिहिलेला कागददेखील सापडला होता. 

दहशतवादी कारवाया करण्याचा रचला होता कट

आरोपींनी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तेलंगणा आणि इतरांसह अनेक राज्यांमध्ये दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचला असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्या या कारवायांमुळे अनेक विघातक कृत्ये होण्याची शक्यता होती. तसेच एनआयएने केलेल्या तपासात आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि सध्या सुरू असलेल्या प्रकरणात आयएसआयएस  हँडलर्सचा सहभाग असल्याचं उघड करण्यात आलं आहे.   भारतामध्ये ISIS च्या अतिरेकी विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी एक मोठे नेटवर्क देखील या तपासात उघड झालं आहे. 

इतर महत्वाची बातमी-

मोठी बातमी! मराठवाड्यातील दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक येणार; तारीखही ठरली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines Superfast News 8PM 07 July 2024Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Embed widget