एक्स्प्लोर
पुण्यात तब्बल 17 हजार लिटर देशी दारु जप्त
पुणे विभागातील आतापर्यंतची देशी दारुविरोधातली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात देशी दारु बाजारात येण्यापासून वाचली आहे.
पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे शाखेने होळी आणि धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या धडक कारवाईत तब्बल 17 हजार लिटर देशी दारु जप्त करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातल्या सोरतापवाडी इथल्या कंजारभाट वस्तीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. यात कंजारभाट वस्तीत देशी दारुचे उत्पादन करुन मोठ्या प्रमाणात देशी दारुचा साठा करण्यात आला होता. तसंच गावठी दारुची भट्टी सुरु होती.
पथकाने रात्रीच्या वेळी या ठिकाणी छापा मारला. मात्र अंधाराचा फायदा घेत इथले कामगार आणि भट्टी मालकाने पळ काढला. पथकाच्या हाती देशी दारुचा मोठा साठा पथकाच्या हाती लागला. यात गावठी दारुने भरलेले 487 मोठे कॅन, 43 हजार लिटर रसायन, 17 हजार 150 लिटर गावठी दारु, 10 वाहनं आणि हातभट्टीचं इतर साहित्य, असा 22 लाख 48 हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
पुणे विभागातील आतापर्यंतची देशी दारुविरोधातली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात देशी दारु बाजारात येण्यापासून वाचली आहे. आता फरार झालेले कामगार आणि भट्टी मालकाचा शोध घेण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement