एक्स्प्लोर

पुण्यात कोरोनामुळे पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू; राज्यात आतापर्यंत चार जणांचा बळी

पुण्यात आज सहायक पोलीस फौजदाराचा कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात आतापर्यंत चार पोलिसांचा कोरोनामुळे जीव गेला आहे.

पुणे : कोरोना संसर्गामुळे आज आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. फरासखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार दिलीप पोपट लोंढे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर भारती रुग्णालय धनकवडी येथे उपचार सुरू असताना दुपारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. राज्यात आत्तापर्यंत कोरोनाने चार पोलिसांचा जीव घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच वय वर्ष 55 वरील पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर येण्यास मनाई करण्यात आली आहे.

यापूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदुरकर, संदीप सुर्वे आणि कॉन्टेबल शिवाजी सोनावणे यांचा मुंबईत मृत्यू झाला. तर, आज फरासखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार दिलीप पोपट लोंढे यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर धनकवडी येथील भारती रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. राज्यात आत्तापर्यंत कोरोनाने चार पोलिसांचा जीव घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच वय वर्ष 55 वरील पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर येण्यास मनाई करण्यात आली आहे.

विधानपरिषद निवडणूक : शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे उमेदवार

पोलिसांना 50 लाखांचं कवच राज्यात आतापर्यंत 300 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर, चार पोलिसांचा यामुळे मृत्यू देखील झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संकटकाळात महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. राज्यातील पोलीस दल कोरोनाविरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पुण्यातील वारजेतील मजूर अड्ड्यावर परप्रांतीयांची गर्दी; पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

पोलिसांसाठी विशेष योजना कोरोना संदर्भात प्रकृतीची कोणतीही तक्रार असलेल्या पोलिसाला वा अधिकाऱ्याला तातडीने उपचार मिळावेत याकरिता एक स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष निर्माण करण्यात आला आहे. मुंबईसाठी सहपोलीस आयुक्त नवल बजाज तर महाराष्ट्रासाठी अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर देखील संबंधित पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक हे अशा प्रकारच्या कक्ष निर्माण करतील. तसेच मुंबईमध्ये दोन हॉस्पिटल हे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. कोरोना विरुद्धच्या लढाईत आपल्याला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचा आहे. त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले होते.

Lockdown | पुणे पोलीस मुभा देत नाहीत तोपर्यंत दुकाने उघडणार नाही; जिल्हा रिटेल व्यापारी संघाचा निर्णय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?

व्हिडीओ

Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
Nashik Municipal Corporation: नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच! भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शड्डू
नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच! भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शड्डू
BMC Election : राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
Embed widget