एक्स्प्लोर

विधानपरिषद निवडणूक : शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे उमेदवार

महाराष्ट्रातील विधान परिषदेची निवडणूक 21 मे रोजी पार पडणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटला आहे. शिवसेनेने विधान परिषद निवडणुकीसाठी दोन उमेदवारांची नाव जाहीर केली आहेत.

मुंबई : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणुका होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटला आहे. अशातच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन नावं जाहीर करण्यात आली आहेत. या निवडणूकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निलम गोऱ्हे यांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख आणि पूर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या 21 मे रोजी मुंबईत ही निवडणूक होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे 27 मे 2020 पूर्वी विधानपरिषदेची निवडणूक होणं आवश्यक आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विधान परिषदेच्या या 9 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया रोखली होती. राज्यातील सद्यस्थितीतील अनिश्चितता संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी निवडणूक आयोगाला 24 एप्रिलपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेतील 9 जागा भरण्याची विनंती केली होती.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यामुळे विधानपरिषद निवडणुकीची गणितं बदलली आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 105 जागा जिंकणाऱ्या भाजपला आता विधानपरिषद निवडणुकीत तुलनेनं कमी जागांवर संधी मिळणार आहे. विधानसभेचं पक्षीय बलाबल पाहता शिवसेना दोन, राष्ट्रवादी दोन आणि काँग्रेसला एक जागा सुटू शकते. तर, भाजपच्या चार जागा निवडून येऊ शकतात. त्यामुळे महाविकासआघाडीला पाच आणि भाजपला चार जागा मिळणार असून 21 मे रोजी पार पडणारी विधानसभेची निवडणूक बिनविरोधच पार पडणार अशी चिन्ह दिसून येत आहेत.

विधानपरिषद निवडणूक; भाजपमध्ये अडगळीत पडलेल्या अनेकांना पुन्हा संधी मिळण्याची आशा

शिवसेनेकडून दोन उमेदवार म्हणजेच, उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांच्या नावाची घोषणा केली आहे. अद्याप राष्ट्रवादी आणि काँग्रेस याच्याकडून उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली नाही. भाजपमध्ये मात्र विधान परिषदेसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यापैकी भाजपचे अरुण अडसड, स्मिता वाघ आणि पृथ्वीराज देशमुख यांच्या जागा रिक्त होणार आहेत. तसेच चौथ्या जागेसाठी भाजप मित्रपक्ष आणि अपक्षांची जुळवाजुळव करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भाजपच्या चार जागांसाठी विधानसभेत पराभूत झालेले किंवा उमेदवारी न मिळालेल्या 'स्वकीय आणि परकीय' अशा दोन्ही इच्छुकांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. दरम्यान, भाजपच्या पद्धतीनुसार संभाव्य उमेदवारांची यादी केंद्रीय संसदीय समितीकडे पाठवण्यात आली आहे. या जागांसाठी अनेक नावांची शिफारस राज्याच्या कोअर कमिटीकडून करण्यात आली आहे. याबाबत शिक्कामोर्तब केंद्रीय नेतृत्वाकडूनच केला जाणार आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी आपण इच्छुक, पक्षश्रेष्ठींना कळवलंय : एकनाथ खडसे

निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर

विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 11 मे पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. तर यासाठी 21 तारखेला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 26 मेपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक, निवडणूक कार्यक्रम जाहीर

विधान परिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभागृह सदस्यत्वाचा पेच सुटणार? देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शुभेच्छा

महत्त्वाच्या बातम्या

शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Nashik Crime News: नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
Embed widget