Ajit Pawar: अजित पवारांच्या निकटवर्तीयांकडून वृद्ध नागरिकाला मारहाण; अजितदादांना विचारणा करताच म्हणाले, 'त्यांचा फोन बंद आहे...'
Ajit Pawar on Baburao Chandere : अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांनी एका नागरिकाला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे (Baburao Chandere) यांनी एका नागरिकाला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबुराव चांदेरे (Baburao Chandere) यांनी भरदिवसा विजय रौंदळ या नागरिकाला मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबुराव चांदेरे (Baburao Chandere) हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे माजी नगरसेवक पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर ते अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. या अगोदरही बाबुराव चांदेरे (Baburao Chandere) यांनी एका रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आज एका नागरिकाला मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे, या घटनेनंतर अजित पवारांच्या पक्षासह बाबुराव चांदेरे यांच्यावर टीका केली जात आहे. या घटनेवरती अजित पवारांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवारांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले की, जे झालं ते अतिशय चुकीचं आहे. कोणालाही अशा प्रकारे कायदा हातामध्ये घेता येत नाही. त्यांना फोन केला होता, त्यांचा फोन बंद आहे. त्यांच्या मुलाशी बोलून सांगितलं आहे. की, जो प्रकार झाला आहे, ते मला आवडलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. त्याला बोलून याचा जाब विचारणार आहे. तक्रार दिली तर नक्की कारवाई होणार असल्याचंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं आहे.
बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
बाबुराव चांदेरे (Baburao Chandere) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
एक व्यक्ती व्हिडिओ शूटिंग करत असताना त्यांच्या मोबाईलवर हात मारत त्यांना दमदाटी करण्यात आली. जमिनीच्या वादातून नागरिकाला मारहाण केल्याची माहिती आहे. दरम्यान, त्यानंतर मारहाण करत फोन काढून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये विजय रौंदळ यांच्या डोक्याला व गुडघ्याला जखम झाली. कर्मचारी, अधिकारी व ठेकेदारासमोर हा प्रकार घडला. यानंतर आता बाबुराव चांदेरे यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. याबाबत पोलीस तक्रार देण्यात आलेली आहे, त्यामुळे आता पोलीस काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे.
जमिनीच्या वादातून ही मारहाण
हा संपूर्ण प्रकार जमिनीच्या वादातून घडला असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी बाबुराव चांदेरे यांनी नागरिकाला चापट मारली आणि त्यानंतर त्याला उचलून खाली आपटलं. यामध्ये त्यांच्या डोक्याला व गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. चांदेरे यांनी नागरिकाला मारहाण करत त्यांचा फोन काढून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये विजय रौंदळ यांच्या डोक्याला व गुडघ्याला जखम झाली आहे.