एक्स्प्लोर

BJP Pune Meeting : मेधा कुलकर्णी बैठकीतून उठून गेल्या; चंद्रकांतदादा-मोहोळांकडून महिला आघाडीच्या त्या आंदोलनाचं समर्थन; बैठकीवेळी नेमकं काय घडलं?

BJP Pune Meeting : महिला आघाडीच्या आंदोलनानंतर मेधा कुलकर्णी यांनी शहराध्यक्षांचे कान टोचले, मात्र दुसरीकडे फक्त चंद्रकांत पाटीलच नव्हे तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा महिला आघाडीच्या आंदोलनाची पाठराखण केली.

पुणे : पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने केलेल्या पैशांच्या मागणीमुळे गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर विरोधात अनेक संघटनांनी आंदोलन केलं होतं. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाची महिला आघाडी देखील होती. भाजपा महिला आघाडीने फक्त दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर आंदोलनच केलं नाही, तर तनिषा भिसे प्रकरणात ज्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता, त्यांच्या कुटुंबीयांचं क्लिनिक देखील फोडलं होतं. या आंदोलनावर आणि तोडफोडीवरती खासदार मेधा कुलकर्णी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र लिहिलं आणि सोम्या-गोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या आंदोलकांना समज द्यावी असंही पुढे मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं होतं. या पत्रानंतर भाजपमध्ये उघड दोन गट पडल्याचे पाहायला मिळालं. त्याचबरोबर भाजपमधील कोल्ड वॉर देखील समोर आलं होतं, त्याचेच पडसाद काल (मंगळवारी, ता,9) रात्री झालेल्या भाजपच्या अंतर्गत बैठकीत देखील उमटल्याचे दिसून आले. 

काल मेधा कुलकर्णी या बैठकीतून बैठक संपण्याआधीच निघाल्या. त्यांचा नियोजित कार्यक्रम होता. कालची बैठक वेळेवर आयोजित करण्यात आली होती. मात्र, मेधा कुलकर्णी यांना पूर्व नियोजित वंदे मातरम संस्थेचा कार्यक्रम होता. त्यामुळे दोन्ही कार्यक्रमाला उपस्थिती लागावी म्हणून निघून आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. काल पुण्यात भाजप संघटन पर्व याची बैठक पार पाडली. या बैठकीतून त्या निघून गेल्या म्हणून चर्चेला उधाण आलं होते. काल रात्री भारतीय जनता पक्षाची अंतर्गत बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये भाजपा महिला आघाडीच्या आंदोलनाचे पडसाद उमटणार याची चर्चा सुरू होती. चंद्रकांत पाटील यांनी महिला आघाडीच्या आंदोलनाची उघड पाठराखण करत, 'महिला आघाडीने केलेले आंदोलन त्यांच्या घरासाठी नव्हे तर संघटनेसाठी होते. आंदोलन करताना ते चुकीच्या पद्धतीने झाले देखील असेल, पण यामुळे कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होता कामा नये' असं म्हटलं आहे.

पाटीलच नव्हे तर केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांचीही पाठराखण

महिला आघाडीच्या आंदोलनानंतर मेधा कुलकर्णी यांनी शहराध्यक्षांचे कान टोचले, मात्र दुसरीकडे फक्त चंद्रकांत पाटीलच नव्हे तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा महिला आघाडीच्या आंदोलनाची पाठराखण केली. '19 वर्षांपूर्वी आंदोलन करताना माझ्याकडून तोडफोड झाली होती. ती चुकीचीच होती, पण कार्यकर्ता म्हणून पक्ष माझ्या पाठीशी उभा राहिला. तुम्ही जशास तसे उत्तर द्यायला शिका. एखादा पक्षाचा नेता चुकीचं सांगत असेल तर तुम्ही चुकीचं बोलताय असं म्हणायला शिका'. असं म्हणत मुरलीधर मोहोळ यांनी महिला आघाडीच्या आंदोलनाचं समर्थन केलं आहे. त्यामुळे आता भाजपमध्ये कोल्ड वॉर चालू असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मेधा कुलकर्णी मोहोळ-पाटील यांच्या भाषणापूर्वीच बैठकीतून बाहेर

भारतीय जनता पक्षाची ही बैठक सायंकाळी साडेचार वाजता सुरू होणार होती. या बैठकीसाठी खासदार मेधा कुलकर्णी या चार वाजताच बैठक स्थळी उपस्थित राहिल्या. मात्र, बैठक सुरू होण्यासाठी तब्बल साडेपाच ते पावणे सहा वाजले. या बैठकीनंतर मेधा कुलकर्णी यांचे काही नियोजित कार्यक्रम होते. या कार्यक्रमाचे कारण देत त्या बैठक सुरू झाल्यानंतर काही वेळातच मेधा कुलकर्णी बैठकीच्या बाहेर पडल्या. मात्र, कुलकर्णी बैठकीतून बाहेर पडत असताना मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांचे भाषण बाकी होते. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर पक्षात कोल्ड वॉर सुरू असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?? रुसवे फुगवे असेल तर दोन ठाकरे बंधू बोलतील; ठाकरेंच्या नेत्याचा खोचक टोला
संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?? रुसवे फुगवे असेल तर दोन ठाकरे बंधू बोलतील; ठाकरेंच्या नेत्याचा खोचक टोला
लव्ह यु दादा... भविष्यानं माझ्या ताटात काय वाढून ठेवले, ते सांगता येणार नाही; अमोल मिटकरींचं अजित दादांना व्हॅलेंटाईन पत्र
लव्ह यु दादा... भविष्यानं माझ्या ताटात काय वाढून ठेवले, ते सांगता येणार नाही; अमोल मिटकरींचं अजित दादांना व्हॅलेंटाईन पत्र
विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ
विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ
नरहरी झिरवळ आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला; मंत्रालयातील लाचप्रकरणावर नाना पटोले स्पष्टच बोलले
नरहरी झिरवळ आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला; मंत्रालयातील लाचप्रकरणावर नाना पटोले स्पष्टच बोलले

व्हिडीओ

Sanjay Raut PC : ज्यांनी शेण खाल्ले त्यांना जाब विचारला जाईल,चंद्रपूर महापौर प्रकरणावर राऊतांचा संताप
Shashikant Shinde NCP Merger :दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो
Narhari Zirwal On Bribe Case : लाच प्रकरणाचा माझ्याशी संबंध सिद्ध झाला तर राजीनामा दईन
Monkey Attack School Student In Nandurbar : नंदूरबारच्या शाळेत माकडांचा उच्छाद,वनविभाग त्रासातून कधी सुटका करणार? Special Report
Ahilyanagar Saundala : जातमुक्तीच्या संकल्पातून घडलेलं आदर्शगाव 'सौंदाळा' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?? रुसवे फुगवे असेल तर दोन ठाकरे बंधू बोलतील; ठाकरेंच्या नेत्याचा खोचक टोला
संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?? रुसवे फुगवे असेल तर दोन ठाकरे बंधू बोलतील; ठाकरेंच्या नेत्याचा खोचक टोला
लव्ह यु दादा... भविष्यानं माझ्या ताटात काय वाढून ठेवले, ते सांगता येणार नाही; अमोल मिटकरींचं अजित दादांना व्हॅलेंटाईन पत्र
लव्ह यु दादा... भविष्यानं माझ्या ताटात काय वाढून ठेवले, ते सांगता येणार नाही; अमोल मिटकरींचं अजित दादांना व्हॅलेंटाईन पत्र
विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ
विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ
नरहरी झिरवळ आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला; मंत्रालयातील लाचप्रकरणावर नाना पटोले स्पष्टच बोलले
नरहरी झिरवळ आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला; मंत्रालयातील लाचप्रकरणावर नाना पटोले स्पष्टच बोलले
Pune Bus Fire : बसमध्ये 50 प्रवासी; अचानक शॉक सर्किट अन्...; पुण्यात PMPMLच्या चालत्या बसने घेतला पेट, क्षणार्धात जळून खाक
बसमध्ये 50 प्रवासी; अचानक शॉक सर्किट अन्...; पुण्यात PMPMLच्या चालत्या बसने घेतला पेट, क्षणार्धात जळून खाक
शंभूराज म्हणाले, भाजपची भूमिका नेहमीच सोयीस्कर; चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर, सांगितलं सांगलीतलं गणित
शंभूराज म्हणाले, भाजपची भूमिका नेहमीच सोयीस्कर; चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर, सांगितलं सांगलीतलं गणित
Bangladesh Election Result 2026: बांगलादेशात कट्टर धर्मांध राजकारण करणाऱ्या जमात ए इस्लामीचा तब्बल 10 पक्षांसोबत युती करूनही निवडणुकीत दारुण पराभव! बांगलादेश निवडणुकीतील 5 टर्निंग पाँईट
बांगलादेशात कट्टर धर्मांध राजकारण करणाऱ्या जमात ए इस्लामीचा तब्बल 10 पक्षांसोबत युती करूनही निवडणुकीत दारुण पराभव! बांगलादेश निवडणुकीतील 5 टर्निंग पाँईट
Mumbai Goregaon Fire: मुंबईत पुन्हा अग्नितांडव, गोरेगावमधील 45 मजली इमारतीला आग; मुंबईत पुन्हा अग्नितांडव, रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले!
मुंबईत पुन्हा अग्नितांडव, गोरेगावमधील 45 मजली इमारतीला आग; मुंबईत पुन्हा अग्नितांडव, रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले!
Embed widget