एक्स्प्लोर

Pune Rain Update: पावसाचे थैमान! या सोसायट्यांमध्ये छातीपर्यंत साचलं पाणी, पुण्यातील हे पूल वाहतुकीसाठी बंद

Pune Rain Update: पुण्यात झालेल्या पावसामुळे अनेक छोटे आणि मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. बहुतांश पूल अंडरपास सुद्धा वाहतुकीसाठी बंद केले आहेत. वाहतूक कोंडी आणि इतर दुर्घटना होऊ नये म्हणून प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे.

पुणे: पुणे शहर परिसरात काल  रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.अद्याप पाऊस सुरूच आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पुणे शहरात (Pune Rain) अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) सोडण्यात येणारा पाण्याच्या विसर्ग वाढवण्यात आला, यामुळे मुठा नदी पात्र देखील दुधडी भरून वाहत आहे. मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) 5 सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं आहे. एकता नगर परिसरातील द्वारका, जलपूजन, शारदा सरोवर, शाम सुंदर या सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत.

सिंहगड परिसरातील निंबजनगर परिसरातील सोसायट्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. सिंहगड परिसरातील या सोसायट्यांमध्ये पाणी साचलं होतं. त्यानंतर बचावकार्य सुरू केलं आहे. खडकवासल्यातून होणारा विसर्ग कमी केल्याने साचलेले पाणी ओसरण्यास सुरूवात झाली आहे. पुणे शहरातील अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. काही पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

कोणते पूल बंद? 

पुणे महानगर पालिका हद्दीत बालेवाडी पूल, मुळा नदी पूल, संगम रोड पूल, होळकर पूल, संगमवाडी पूल, महर्षी शिंदे पूल, हडपसर- मुंढवा रोड पूल, मातंग पूल, येरवडा शांतीनगर येथील पूल, निंबजनगर पूल, मोई, व चिकली रस्त्यावरील इंद्रायणी पुल पावसामुळे (Pune Rain) पाण्याखाली गेले आहेत. 

कोणत्या सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी?

पुणे महानगरपालिका हद्दीत एकता नगरी सिंहगड रोड वरील द्वारका सोसायटी, शरदा सरोवर सोसायटी, शाम सुंदर सोसायटी, निंबजनगर परिसरातील सोसायटी, सिंहगड रोड, घरकुल सोसायटी पिंपरी चिंचवड, वृंदावन आश्रम आकुर्डी विशालनगर, जगताप डेअरी विणस सोसायटी, कुंदननगर या गृह निर्माण हाउसिंग सोसायटी मध्ये पावसाचे पाणी (Pune Rain) शिरले आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. निंबजनगर परिसरातील सोसायटी व सिंहगड रोडवरील सोसायट्यामध्ये पाणी शिरल्याने घरात लोक अडकलेली आहेत त्यांना खाद्य पदार्थ आणि पाणी इत्यादी व्यवस्था करण्यात आली आहे.

भिमाशंकर-खेड रोडवर दरड कोसळली असून खेड मधून भिमाशंकरकडे (Pune Rain) जाणार रस्ता बंद आहे. वडघर ता. वेल्हा येथे डोंगराची माती रस्त्यावर आली होती. ती माती बाजूला करून रस्ता वाहतूक सुरू केली आहे. मौजे-दासवे ता. मुळशी लवासा लेक सिटी येथील बंगल्यावर दरड कोसली आहे. सदर बंगल्यात ३ जण अडकले असल्याबबत प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. एनडीआरएफ टीम काम करत आहे. त्याच बरोबर पर्यटन स्थळ ठिकाणी २४ तासाकरिता बंदी आदेश जारी करण्यात आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget