एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

IPS Vijay Raman : पान सिंह तोमर आणि संसदेवरील हल्ल्याच्या मास्टमाईंडचा एन्काउंटर करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याचे निधन

IPS Vijay Raman : आयपीएस अधिकारी (निवृत्त) विजय रमण यांनी पान सिंह तोमर आणि दहशतवादी गाजीबाबा यांना चकमकीत ठार केले होते.

पुणे हाय प्रोफाईल आयपीएस अधिकारी असलेले विजय रमण यांचे पुण्यातील रुग्णालयात निधन झाले. मागील काही महिन्यापासून त्यांची  कर्करोगासोबत झुंज सुरू होती. मात्र, त्यांची झुंज अपयशी ठरली. कर्करोगावर सुरू असलेल्या उपचारांना ते सकारात्मक प्रतिसाद देत होते. मात्र, त्यांची प्रकृती अचानक ढासळू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आयपीएस अधिकारी (निवृत्त)  विजय रमण यांनी पान सिंह तोमर आणि दहशतवादी गाजीबाबा यांना चकमकीत ठार केले होते. 

रमण हे मध्य प्रदेश केडरचे 1975 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. विजय रमण यांना फेब्रुवारीमध्ये कर्करोग झाल्याचे निदान झाले होते आणि तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांच्यात सुधारणा झाल्याचे लक्षण दिसून आल्याचे पत्नी वीणा यांनी सांगितले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने विजय रमण यांना 18 सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना पुन्हा आयसीयूमध्ये हलवण्यात आले. गुरुवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली आणि कुटुंबीय त्यांना दोन-तीन दिवस घरी घेऊन जाणार होते, मात्र त्यांचे अचानक निधन झाले. अशा परिस्थितीत त्यांच्या निधनाने कुटुंबातील सर्वांनाच धक्का बसला आहे.

जेव्हा फुलन देवी यांनी रमण यांना हटवण्याची मागणी केली...

चंबळ परिसरात वास्तव्यास असलेल्या दरोडेखोर, डाकूंमध्ये विजय रमण यांची भीती होती. असं म्हणतात की, जेव्हा फुलन देवीने शरणागती पत्करली तेव्हा त्यांनी विजय रमणच्या जागी अन्य कोणाला तरी भिंडचा पोलीस अधीक्षक बनवण्याची मागणी केली होती. विजय रमण यांनी अनेक दहशतवादी आणि नक्षलविरोधी
 मोहिमांमध्ये  सहभाग घेतला होता. त्यांनी मध्य प्रदेश पोलिस, सीआरपीएफ, बीएसएफ आणि रेल्वे पोलीस दलात जबाबदारी सांभाळली होती. 

संसद हल्ल्याचा मास्टरमाईंड गाझी बाबाचा एन्काउंटर

2003 मध्ये विजय रमन हे श्रीनगरमध्ये सीमा सुरक्षा दलाचे आयजी म्हणून तैनात होते. त्यांनी 10 तासांच्या आव्हानात्मक चकमकीचे नेतृत्व केले होते.  यामध्ये संसद हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि दहशतवादी गाझी बाबा मारला गेला. त्याच वेळी, 1981 मध्ये, अॅथलीट-डाकू पानसिंग तोमरचा एन्काउंटर देखील विजय रमण यांच्या नेतृत्वाखाली झाला होता. पान सिंग तोमर विरुद्धची ही चकमक 14 तास चालली होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Sharad Pawar: राज्यात पवार पॅटर्न फेल, थोरल्या पवारांनी राज्य पिंजून काढलं पण तुतारी वाजलीच नाही
राज्यात पवार पॅटर्न फेल, थोरल्या पवारांनी राज्य पिंजून काढलं पण तुतारी वाजलीच नाही
Embed widget