फेसबुकच्या फीचर गैरवापर, व्यावसायिकावर गोळीबार
फेसबुकवरील लोकेशन फीचर्सच्या आधारे या तरुणांनी हरिओमचा माग काढला. त्याप्रमाणे या सहा तरुणांनी पाषाणहुन ताथवडे येथे चारचाकीतून आलेल्या हरीओमचा पाठलाग केला.

पिंपरी : फेसबुकवरील अनोळख्या व्यक्तीची फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारणं पिंपरी चिंचवडमधील व्यावसायिकाच्या जीवावर बेतलं आहे. फेसबुक फिचर्सचा वापर करत खंडणीसाठी या व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे.
रियल इस्टेट एजंट असलेल्या हरिओम सिंग यांना नंदिनी मोहोळ नावानं बनावट फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. हरिओम यांनी ही बोगस अकाउंटची रिक्वेस्ट स्वीकारली. महिला म्हणून आरोपींनी हरिओमशी चॅटिंग सुरु ठेवलं. मात्र दुसरीकडे या तरुणांच्या डोक्यात खंडणीचा कट शिजत होता. फेसबुकवर हरिओमचे लोकेशन या आरोपींना वेळोवेळी कळायचे.
फेसबुकवरील लोकेशन फीचर्सच्या आधारे या तरुणांनी हरिओमचा माग काढला. त्याप्रमाणे या सहा तरुणांनी पाषाणहून ताथवडे येथे चारचाकीतून आलेल्या हरीओमचा पाठलाग केला. कामानिमित्त खाली उतरलेले हरिओम गाडीत बसताना, तीन तरुण त्यांच्या गाडीत घुसले. बंदुकीचा धाक दाखवून गाडी पुढे घेण्याची धमकी त्यांनी दिली.
मात्र संधी साधून हरिओम यांनी गाडीतून पळ काढला. त्यावेळी एकाने त्यांच्या दिशेने गोळी झाडली. ती गोळी हरिओम यांच्या पायाला लागल्याने ते गंभीर जखमी झाले.
पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या प्रकणाचा छडा लावत सहा जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे सहाही आरोपी उच्चशिक्षित आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
