(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Akshay Shinde Encounter : '...मग मावळ अत्याचार अन् हत्या प्रकरणातील नराधमाचं ही एन्काऊंटर करा', न्यायासाठी पीडित कुटुंबियांची मागणी
Akshay Shinde Encounter : बदलापूर घटनेतील नराधमाचे दीड महिन्यांतच एन्काऊंटर झालं, यामुळं मी भोगत असलेल्या मनस्तापातून या पीडित कुटुंबियांची सुटका झाली. अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
पुणे: बदलापूर प्रकरणातील नराधमाचं एन्काऊंटर करून, पीडित कुटुंबियांना तातडीनं न्याय मिळवून दिला. याचं मी समर्थन करतो. पण एन्काऊंटर हेचं यावरचं उत्तर असेल तर माझ्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाचं ही एन्काऊंटर करावं. अशी मागणी मावळमधील पीडितेच्या वडिलांनी केली आहे. कोथुर्णे गावात सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. 2 ऑगस्ट 2022 या घटनेतील नराधमाला मार्च 2024 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. बदलापूर घटनेवेळी याच फाशीच्या शिक्षेवरून मोठं राजकारण झालं होतं. मात्र, आता बदलापूर घटनेतील नराधमाचे दीड महिन्यांतच एन्काऊंटर झालं, यामुळं मी भोगत असलेल्या मनस्तापातून या पीडित कुटुंबियांची सुटका झाली. अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र न्याय मिळवण्यासाठी एन्काऊंटर हे उत्तर असेल तर माझ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचे ही एन्काऊंटर करावे, अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी सरकारकडे केली आहे. (Akshay Shinde Encounter)
अशा नराधमाचं एन्काऊंटर होणं गरजेचं आहे. त्या घटनेला माझा पुर्णपणे पाठिंबा आहे.वअशीच घटना घडावी जेणेकरून आरोपी असं वागताना विचार करेल, त्याला काहीसा आळा बसेल, आरोपी असं कृत्य करताना धजावतील, आमच्या मुलीच्या प्रकरणात देखील सरकारने निर्णय दिला. मात्र, अद्याप त्याबाबत अमंलबजावणी झालेली नाही, एन्काऊंटर होणं स्वागतार्ह आहे. जेव्हा अशी घटना घडते तेव्हा लगेच त्या आरोपीला फाशी देण्यात यावी, यामध्ये वेळ घालवता कामा नये, अशा आरोपींना फाशीच देण्यात यावी, या घटनेच्या त्रासातून मी गेलो आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. (Akshay Shinde Encounter)
मावळमधील अत्याचार प्रकरणाचा घटनाक्रम जशाचा तसा
बदलापुरात शाळेत झालेल्या चिमुकलीवर अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येतो आहे. दरम्यान, हे प्रकरण जेव्हा मोठ्या प्रमाणावर तापलं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मावळमधील एका घटना फास्टट्रॅक चालवून आम्ही आरोपीला 2 महिन्यात फाशी दिली, असा दावा केला. मात्र, हे प्रकरण निकाली लावण्यासाठी 1 वर्ष 7 महिने लागले होते. मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावात असेच एक प्रकरण घडले होते. 2 ऑगस्ट 2022 रोजी 6 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आले होती. त्यानंतर 3 ऑगस्ट 2022 रोजी मृतदेह सापडला. कामशेत पोलिसांकडून आरोपीसह त्याच्या आईला 24 तासांच्या आत अटक करण्यात आली. जलदगीत न्यायालयाकडे प्रकरण वर्ग करण्यात आले. खटल्यात 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आणि उलटतपासणी करण्यात आली. 23 मार्च 2024 रोजी न्यायालयाने आरोपीस फाशीची शिक्षा सुनावली. मात्र त्याी अमंलबजावणी बाकी आहे.
अशातच काल घडलेल्या एन्काऊंटरच्या घटनेनंतर पुन्हा एकदा मावळमधील पिडितेच्या कुटूंबियांनी या घटनेबाबत आंनद व्यक्त केला आहे.