एक्स्प्लोर

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे : दीपक म्हैसेकर

सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्याबरोबरच मास्क, सॅनिटायझर व वेळोवेळी हातांच्या स्वच्छतेवर सर्वांनी भर देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कोविड-19 ची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ नजीकच्या फ्ल्यू क्लिनिकमध्ये तपासणी करुन घ्यावी, असं आवाहनही दीपक म्हेैसेकर यांनी केलं.

पुणे : पुण्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनीही घराबाहेर न पडता, गर्दी टाळून सूचनांचे तंतोतंत पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले. पुण्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीची माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

पुणे विभागात कोरोनाबाधीत 2388 रुग्ण असून 617 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 1644 अॅक्टिव्ह केसेस असून 127 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 93 रुग्ण गंभीर असून उर्वरित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात 2122 कोरोनाबाधीत रुग्ण असून 553 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ॲक्टिव्ह केसेस 1454 असून 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 86 रुग्ण गंभीर असून उर्वरित रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती दीपक म्हैसेकर यांनी दिली.

सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्याबरोबरच मास्क, सॅनिटायझर व वेळोवेळी हातांच्या स्वच्छतेवर सर्वांनी भर देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कोविड-19 ची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ नजीकच्या फ्ल्यू क्लिनिकमध्ये तपासणी करुन घ्यावी. कोविड-19 रुग्णांना वैद्यकीय सुविधा देणाऱ्या रुग्णालयांसाठी पुरेसे पीपीई किट, मास्क उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यात येत असून वैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती तयार करण्यात आली आहे. ससूनमध्ये प्रायेगिक तत्वावर प्लाझ्मा थेरपीसाठी परवानगी मिळाली आहे. एका व्यक्तीचे रक्तसंकलन करण्यात आले असून लवकरच कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरपीव्दारे उपचार सुरु करण्यात येईल,असं दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

आपल्या जिल्ह्यातून मूळगावी जाणाऱ्या तसेच पर जिल्ह्यातून आपल्या जिल्हयात येणाऱ्या नागरिकांची सोय करण्याकरता प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत. परराज्यात अथवा पर जिल्ह्यात जाण्यासाठी इच्छुकांना कोणत्याही डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त करुन ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. तसेच त्यांना ज्या भागात जायचे आहे, तेथील प्रशासनाची परवानगी आल्यानंतरच जाण्याची परवानगी दिली जाईल. केंद्र व राज्य शासनाचा निर्णय झाल्यास त्यांच्यासाठी सोशल डिस्टंन्सिंगचा विचार करुन विशेष रेल्वेची व बसेसची सोय करण्यात येईल. पुणे विभागात देखील काही ठिकाणाहून रेल्वे व बसेसव्दारे विद्यार्थी, कामगार व अडकलेल्या नागरिकांना पाठवण्याबाबत विचार सुरु आहे, असेही म्हैसेकर म्हणाले.

लॉकडाऊनबाबत केंद्र शासनाच्या सूचनांनुसार राज्याने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार विभागातील सर्व जिल्हयांमध्ये कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त व पोलीस आयुक्त शहरातील कन्टेंन्मेंट झोनसाठी तर ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक विविध आदेशांची अंमलबजावणी करत आहेत. झोपडपट्टी भागात अपुऱ्या जागेमुळे सोशल डिस्टंन्सिंगचे पालन होत नसल्याने या भागातील रुग्ण्संख्या वाढत आहे. या ठिकाणी संस्थात्मक कॉरंन्टाईन होण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता, मास्क व सॅनिटायझरचे वाटप अशा उपाययोजना केल्या जात आहेत. कन्टेंन्मेंट झोनमधील नागरिकांनी कोणत्याही प्रकारे ये-जा न करता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये करण्यात येणाऱ्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराबाहेर तसेच ग्रामीण भागात उद्योगधंदे, वाईनशॉप सुरु करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तथापी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन न झाल्यास व दुकानाबाहेर गर्दी झाल्यास संबंधित दुकानाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. वाढत्या रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याच्या दृष्टीने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 16 हजाराहुन अधिक बेडची तयारी करण्यात आली आहे. कोविड-19 सॅम्पल तपासणीचे प्रमाण वाढवण्यात येत असून दररोज सरासरी 850 च्या दरम्यान सॅम्पलची तपासणी करण्यात येत आहे. प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून लवकरात लवकर कोरोनाची वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी कन्टेंन्मेंट झोनमधील कोरोना प्रतिबंधासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. या भागात सार्वजनिक स्वच्छतागृहांची साफसफाई, मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे, असे सांगितले. वेगवेगळ्या कारणास्तव आजारी असणाऱ्या रुग्णांनाही कोरोनाची लागण झाल्याचे ससून व रुबी रुग्णालयाच्या निदर्शनास आल्यानंतर योग्य ती खबरदारी घेण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

आतापर्यंत 1 हजार 219 विद्यार्थ्यांना परवानगी देण्यात आली असून 1 हजार 700 प्रकरणे प्रलंबित असून त्याबाबतची कार्यवाही सुरु असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम यांनी सांगितले. तसेच पोलीस विभागामार्फत या कामासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या 

 Coronavirus | ज्येष्ठांपाठोपाठ वजन जास्त असलेल्यांना कोविडचा धोका
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तरTeam India Victory Parade : चर्चगेट रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचा श्वास गुदमरलाTeam India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget