Dilip Walse Patil on Sharad Pawar : दिलीप वळसे-पाटलांचा पवार साहेबांविषयीचा सॉफ्ट कॉर्नर अजूनही कायम, अजितदादांसमोर म्हणाले...
Dilip Walse Patil : मी अहमदनगर चा पालकमंत्री होतो, पण मी कधी पाण्यावरून संघर्ष निर्माण होऊ दिला नाही. नगरचे पाणी नगरला आणि पुण्याचे पाणी पुण्याला दिले, असेही वळसे पाटलांनी नमूद केले.
Dilip Walse Patil on Sharad Pawar : "शरद पवार साहेबांचं माझ्यावर प्रेम होतं. माझंही त्यांच्यावर प्रेम होतं. उद्याही हे प्रेम कायम राहणार आहे", असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. मंचर येते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी दिलीप वळसे पाटील बोलत होते.
पाण्यासाठी लढाया कराव्या लागणार हे स्पष्ट आहे
दिलीप वळसे पाटील म्हणाले, डिंभे धरण ओव्हर फ्लो झाल्यानंतर बोगद्यातून पाणी न्यायला हरकत नाही, असं पत्र होतं. मात्र त्यात नंतरच्या काळात बदल झाले. तीन तालुक्यात तीन नद्यावर 65 बंधारे आहेत. आपल्या बंधा-यात पाणी तुटून येणार होते. बंधा-यातून पाणी देऊ नका, अशी भूमिका घेतली गेली. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना पाणी द्यायचे कसं असा प्रश्न निर्माण झाला. यापुढे पाण्यासाठी लढाया कराव्या लागणार, हे स्पष्ट आहे.
नगरचे पाणी नगरला आणि पुण्याचे पाणी पुण्याला दिले
नगर जिल्ह्यातील एका नेत्याच्या अनुषंगाने अतुल बेनके यांनी पत्र वाचून दाखवलं. शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत दोन वेळा बैठका झाल्या. आपलं पाणी कर्जत जामखेडला पळवायचं नियोजन होतं. ते आता अजित पवारांनी थांबवलं. मी अहमदनगर चा पालकमंत्री होतो, पण मी कधी पाण्यावरून संघर्ष निर्माण होऊ दिला नाही. नगरचे पाणी नगरला आणि पुण्याचे पाणी पुण्याला दिले, असेही वळसे पाटलांनी नमूद केले.
शिवाजी आढळराव पाटलांवर कधीही व्यक्तिगत टीका केली नाही
देशात लोकसभा निवडणुकीनंतर काय वातावरण तयार होतंय, हे पाहून विधानसभेबद्दल बोलणं आणि चर्चा करणे उचित होईल. पण विधानसभेची तुम्ही काळजी करू नका, असंही वळसे पाटलांनी स्पष्ट केलं. शिवाजी आढळराव पाटील आणि मी गेली तीस वर्षे काम करतोय. पंधरा वर्षानंतर ते वेगळे झाले. मात्र, शिवाजी आढळराव आणि मी एकमेकांवर कधी वैयक्तिक टीका केली नाही.
स्वतःच्या प्रयत्नातून एखादी तरी पतसंस्था उभारली का?
आढळराव व मी 15 वर्ष एकमेकांच्या विरोधात लढलो. मात्र 15 वर्षात एकदाही आम्ही एकमेकांवर टीका केली नाही की संस्थावर टीका केली नाही. तुमच्या स्वतःच्या प्रयत्नातून एखादी तरी पतसंस्था उभारली का? असा सवाल वळसे पाटील यांनी शरद पवार गटाचे नेते देवदत्त निकम यांना केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या