PCMC Potholes News: खड्ड्यांचं रडगाणं संपेना! खड्डे बुजविण्यासाठी थेट पोलीस उपायुक्तांनी घेतला पुढाकार
द्रुतगती मार्गावरून किवळे आणि मुकाई चौकात येताना या खड्ड्यांमुळं वाहतूक कोंडी व्हायची. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेवटी पोलीस उपायुक्त आनंद भोईटेंनी वाहतूक पोलीस आणि ट्रॅफिक वॉर्डनच्या मदतीने हे खड्डे भरले.
PCMC Potholes News: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून पिंपरी चिंचवड शहरात दाखल होणाऱ्या मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य आहे. हेच खड्डे बुजविण्यासाठी थेट पोलीस उपायुक्तांनी पुढाकार घेतला. द्रुतगती मार्गावरून किवळे आणि मुकाई चौकात येताना या खड्ड्यांमुळं वाहतूक कोंडी व्हायची. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेवटी पोलीस उपायुक्त आनंद भोईटेंनी वाहतूक पोलीस आणि ट्रॅफिक वॉर्डनच्या मदतीने हे खड्डे भरले.
पुण्यात आणि पिंपरी-चिंचवड शहरात खड्यांचं साम्राज्ज बघायला मिळतं. यंदा प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्याने सगळीकडे रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याकडे मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचं सातत्याने नजरेस आलं आहे. त्यामुळे विविध पक्षांकडून वेळोवेळी आंदोलनं करण्यात आली मात्र त्या आंदोलनाचा काहीही उपयोग झाल्याचं चित्र दिसलं नाही. या सगळ्यांबाबत तक्रार करुनही प्रशासन जागं झालं नसल्याने थेट पोलीस उपायुक्तांनी पुढाकार घेतला आहे.
खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेकदा नागरीकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. तासंतास वाहतुकीत गेल्याने वेळेचा अपव्यय होत आहे, अशा तक्रारीदेखील नागरीकांनी केल्या आहेत. मात्र खड्ड्यांच्या सुधाण्याचं किंवा खड्डे बुजवण्याच्या कामाकडे पालिकेचं आणि प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचं सातत्त्याने समोर आलं आहे.
पुण्यात रस्त्यावर खड्डे पडल्याने 3 ठेकेदारांना 3 लाखांचा दंड
डीएलपीमधील 139 रस्ते महापालिकेच्या मुख्य रस्ते विभागांतर्गत असून त्यांची पाहणी करून अहवाल सादर केला आहे. एका खड्ड्यासाठी (एक चौरस मीटर) खर्चाच्या तिप्पट म्हणजे पाच हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अनेक रस्त्यांवर खड्डे असतानाही आतापर्यंत केवळ पाच रस्त्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी तीन कंत्राटदारांनी वसूल केलेला दंड जमा केला आहे. सहा प्रभाग कार्यालयांनी ही माहिती मुख्य रस्ते विभागाला सादर केली. त्यामध्ये औंध बाणेर प्रभाग कार्यालयातील 93 रस्ते, शिवाजी नगर घोले रोड कार्यालय 11, कोथरूड बावधन कार्यालय 81, वारजे कर्वेनगर 150, हडपसर मुंढवा 58, वानवडी रामटेकडी कार्यालय 68, कोंढवा येवलेवाडी कार्यालय 110, कसबा वॉर्ड कार्यालय 110, कसबा 18 वार्ड कार्यालयाचा समावेश आहे. या अहवालात एकूण 640 रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.