एक्स्प्लोर
'बाय वन अँड गेट वन फ्री' लवकरच हद्दपार होणार!
'बाय वन अँड गेट वन फ्री' किंवा 'बाय थ्री अँड गेट टू फ्री' अशा प्रलोभनांना बळी पडून आपल्यातले अनेकजण शॉपिंग करत असतील. पण महिन्याभरापूर्वी लागू झालेल्या वस्तू आणि सेवा कर अर्थात GST चा परिणाम म्हणून आता या फ्री पॉलिसी बंद होणार आहे.
पुणे : 'बाय वन अँड गेट वन फ्री' किंवा 'बाय थ्री अँड गेट टू फ्री' अशा प्रलोभनांना बळी पडून आपल्यातले अनेकजण शॉपिंग करत असतील. पण महिन्याभरापूर्वी लागू झालेल्या वस्तू आणि सेवा कर अर्थात GST चा परिणाम म्हणून आता या फ्री पॉलिसी बंद होणार आहे.
बाजारात 'बाय वन अँड गेट वन फ्री' म्हणजेच एक खरेदी करा, आणि दुसरी फूकट न्या, अशा अनेक ऑफर्सचे फलक सर्रासपणे दिसतात. अनेकदा फ्री वस्तूंच्या प्रलोभनापायी आपण आवश्यक नसलेली वस्तूही खरेदी करतो. मात्र आता ही मोफत असणारी स्कीमच बंद होणार आहे.
कारण जीएसटी, अर्थात वस्तू आणि सेवाकराच्या नव्या कायद्यामुळे मोफत स्कीमचं अर्थकारणच बिघडलं आहे. त्यामागचं गणित म्हणजे याआधी एखाद्या वस्तूवर मॅक्सिमम रिटेल प्राईस म्हणजे MRP किती छापावी? याचा कायदाच नव्हता. त्यामुळे त्यावरची किंमत वाढवून कंपन्या फ्री दिलेल्या वस्तूंचेही पैसे वसूल करत होते.
पण आता फ्री दिल्या जाणाऱ्या वस्तूंवरही जीएसटी हा कर लागणार आहे. त्यामुळेच फ्रीची पॉलिसीच बंद करण्याचं अनेक कंपन्यांनी ठरवलं आहे.
वास्तविक, मोफतची स्कीम ही ग्राहकाला अडकवण्याचं जाळचं असतं. कारण कोणतीही कंपनी स्वतःचं दिवाळं काढून, मोफत वस्तू वाटणार नाही. जीएसटीमुळे त्यामागचं अर्थकारण उलगडलं असून, सध्या याचं अर्थकारण कोलमडल्यामुळे कंपन्या या ऑफर बंद करणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement