एक्स्प्लोर

Pimpri Hording Collapses: होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपये; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Pimpri Hording Collapses: पिंपरी चिंचवडच्या किवळेमध्ये जाहिरातीचे लोखंडी फलक कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातातील  मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. 

Pimpri Hording Collapses: पिंपरी चिंचवडच्या (Hording collapses) किवळेमध्ये जाहिरातीचे लोखंडी फलक कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातातील  मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ  शिंंदे यांनी तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. 

कात्रज-देहू मार्गावरील किवळे ओव्हरब्रीज सर्व्हिस रोडवर वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळल्याने या  दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी तीव्र दुःख तसेच मृत, त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदनाही व्यक्त केली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपयांची मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. 

पिंपरी- चिंचवडच्या रावेत भागात होर्डिंग कोसळलं होतं. होर्डिंग्जच्या खाली पंक्चरचे दुकान दबले गेले होते. त्यावेळी दुकानाजवळ सात ते आठ व्यक्ती होते. त्यातील 4 ते 5 जण दगावले आहेत. सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू असताना काल रात्री ही दुर्घटना घडली. पावसामुळं काही जणांनी पंक्चर दुकानाचा आडोसा घेतला होता. मात्र त्याचवेळी वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळं होर्डिंग खाली कोसळलं आणि पंक्चर दुकानात असणारे होर्डिंगखाली दबले गेले. यावेळी दुकानात उपस्थित असणाऱ्यांना गंभीर जखमी झाले आहेत.  जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

चार जणांवर गुन्हा दाखल 

 पिंपरी चिंचवडच्या किवळेमध्ये जाहिरातीचे लोखंडी फलक कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदोष मनुष्यवधाचा आणि अनधिकृत जाहिरात फलक लावल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे.  याप्रकरणी जागा मालक यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. नामदेव म्हसुगडे असं या मालकाचं नाव आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. बाकी तिघांचा अजूनपर्यंत शोध सुरु आहे. 

आडोसा ठरला घातक; मृतांमध्ये ; चार महिलांचा समावेश

शोभा टाक, वर्षा केदारी,  भारती मंचक, अनिता रॉय, रामअवध आत्मज अशी या अपघातातील मृतांची नावं आहेत. तर विशाल यादव, रहमद अन्सारी, रिंकी रॉय ही जखमींची नावं आहे. या सगळ्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधणं आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्याच्या कामाला प्राधान्य देत असल्याचं पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितलं आहे. या सगळ्या बचावकार्यासाठी आठ क्रेन  आणि तीन जेसीबींची मदत घेण्यात आली होती. त्यासोबतच इतर अग्निशमन दलाचे अधिकारीदेखील उपस्थित होते. 

संबंधित बातमी-

Sharad Pawar : अजित पवारांच्या राजकीय भूकंपांच्या चर्चा; शरद पवार कीर्तनात तल्लीन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi On Amit Shah Sabha : राहुल गांधींचा मोदी-शाहांवर गंभीर आरोप; धारावीच्या जमिनीसाठी..Who is Sajjad Nomani : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले सज्जाद नोमानी कोण आहेत? #abpमाझाDhananjay Munde Parli : बहीण-भाऊ स्टार प्रचारक, तरीही मोठी सभा का नाही? परळीत काय घडतंय?Piyush Goyal Mumbai : मविआवर सडकून टीका ते भाजपचा पुढील प्लॅन; पियूष गोयल यांच्यासोबत बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
×
Embed widget