एक्स्प्लोर

पूजा खेडकरांना खोटं प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईची टांगती तलवार! जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशीचे आदेश

IAS Pooja Khedkar Controversy: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार असतानाच त्यांना अपंगत्वाचं प्रमाणपत्र देणाऱ्यांचेही आता धाबे दणाणले आहेत.

IAS Pooja Khedkar Controversy: पुणे : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांच्या अडचणींत दिवसागणित वाढ होताना दिसत आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या पत्रानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पिंपरी पालिकेला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पिंपरी पालिकेला दिलेल्या आदेशाची प्रत एबीपी माझाच्या हाती लागली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, खोटं अपंगत्वाचं प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांसह मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच, खोटं अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवून देणारं रॅकेट उघडकीस आणण्याचे आदेशही पिंपरी पालिकेला देण्यात आले आहेत.

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार असतानाच त्यांना अपंगत्वाचं प्रमाणपत्र देणाऱ्यांचेही आता धाबे दणाणले आहेत. कारण पुणे जिल्हाधिकारी कार्यालयानं वायसीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांसह पूजाला मदत करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, खोटं अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवून देणारं रॅकेट असल्यास, ते ही उघडकीस आणावं लागणार आहे. 

दिव्यांग कल्याण आयुक्तालयानं जिल्हाधिकारी कार्यालयाला तशा सूचना दिल्या आहेत. त्याआधारे पिंपरी पालिकेच्या वैद्यकीय विभागाला दिलेला तो आदेश एबीपी माझाच्या हाती लागला आहे. वायसीएम रुग्णालयानं पूजा खेडकरांना अपंगत्वाचं प्रमाणपत्र दिलं असून, त्यात पूजा डाव्या गुडघ्यात कायमस्वरूपी सात टक्के अधु असल्याचं म्हटलं आहे. याच प्रमाणपत्राच्या आधारे पूजानं केंद्रीय दिव्यांग विभागाकडून अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवल्यानं या चौकशीला अधिक महत्व प्राप्त झालं आहे. कारण दिव्यांग कल्याण आयुक्तालयानं वायसीएमच्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे त्या शासकीय सेवेत रुजू झाल्यात का? अशी शंका उपस्थित केली आहे. त्याअनुषंगानं याची खात्री पटवण्यासाठी सखोल चौकशी गरजेची आहे. चौकशीत दोषी आढळल्यास अपंगत्वाचं प्रमाणपत्र देणारे डॉक्टर, तसेच मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा. तसेच, खोटं अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवून देणारं रॅकेट आहे का? हे उघडकीस आणावं. तसेच, या संपूर्ण चौकशीचा अहवाल ही जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा, असं या आदेशात म्हटलेलं आहे. त्यामुळं अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या डॉक्टरांसह मदत करणाऱ्या प्रत्येकाचे धाबे दणाणले आहेत.

पूजा खेडकरांवर दिल्लीत गुन्हा दाखल 

पूजा खेडकर यांच्यावर बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याचा आरोप होत असताना त्याची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिस सरसावले आहेत. दिल्ली क्राईम ब्रँचने पूजा खेडकर यांच्यावर गुन्हा नोंदवला असून त्याची चौकशी होणार आहे. दिल्लीमध्ये गुन्हा नोंद झाल्यानंतर पूजा खेडकर यांच्या अडचणीत आता वाढ झाली असून या प्रकरणी त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडे पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला असून त्या सध्या अटकेत आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule : ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
Pratibha Pawar : वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं? 
वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं?
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर  2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra NewsNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणारABP Majha Headlines :  2 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule : ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
Pratibha Pawar : वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं? 
वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं?
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
AAP : कैलाश गेहलोत यांचा आपला धक्का, केजरीवालांचीही मोठी खेळी, BJP चे माजी आमदार अनिल झा आपमध्ये दाखल
कैलाश गेहलोत यांचा आपला धक्का, केजरीवालांचीही मोठी खेळी, BJP चे माजी आमदार अनिल झा आपमध्ये दाखल
Goregaon Vidhan Sabha constituency: गोरेगाव विधानसभा मतदारसंघात विद्या ठाकूर आणि समीर देसाईंमध्ये काँटे की टक्कर, कोण बाजी मारणार?
गोरेगाव विधानसभा मतदारसंघात विद्या ठाकूर आणि समीर देसाईंमध्ये काँटे की टक्कर, कोण बाजी मारणार?
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Embed widget