एक्स्प्लोर

Ajit Pawar : लोणावळा बकाल करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दम

Ajit Pawar : सत्तेत असला तरी चुकीचं वागू नका, कायदा हातात घेऊ नका. सर्वांना नियम सारखे आहेत, असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar On Lonavala : उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या विधानमुळे आणि रोखठोक स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असतात. अजित पवार यांच्या याच स्वभावाची प्रचिती आज आली. अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत लोणावळा बकाल करणाऱ्यांना दम भरला असून सर्वांना नियम सारखे असल्याचा इशाराही दिला. ते पर्यटन विकासावर बोलत होते. त्यावेळी त्यांनी लोणावळ्यातील परिस्थितीवर भाष्य केलं.  अजित पवार म्हणाले की, 'पर्यटन विकास हे खर्चिक काम आहे, पण करायचं आहेच. लोणावळाकरांनो आपलं शहर चांगलं दिसेल, बकालपणा येणार नाही. लोकांना त्रास होणार नाही. गुंड, दहशत, दादागिरी होणार नाही. कायदा सुव्यवस्था चोख असेल. याची काळजी पालकमंत्री म्हणून मला, खासदार-आमदारांना, लोकप्रतिनिधी आणि पोलिसांना देखील घ्यावी लागेल. त्याबद्दल कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. सत्तेत असला तरी चुकीचं वागू नका, कायदा हातात घेऊ नका. सर्वांना नियम सारखे आहेत.'

स्वागतावेळी झालेल्या गर्दीवर अजित पवारांची नाराजी
आज तुम्ही माझं स्वागत लै जंगी केलं. पण माझ्या भगिनी आणि मित्रांच्या तोंडावर मास्क दिसले नाहीत. बाबांनो असं करू नका, तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरू नका. प्लेग च्या साथीत लोकांची रांग लागली होती, नुसते मृतदेह दिसायचे असं मी ऐकलंय, तशी वेळ येऊ द्यायची नाहीये. तेंव्हा काळजी घ्या.

लोणावळा पर्यटनावर काय म्हणाले अजित पवार?
मी पण लोणावळ्यात अनेकदा आलोय. खासकरून उन्हाळ्यात तर यायचोच. खरं तर इथलं वातावरण खूप चांगलंय, इथे आल्यावर कोणी आजारी पडत नाही. आजारी असला तर इथं येऊन ठणठणीत बरा होतो.

जेवताना, पाणी पिताना आणि रात्री झोपतानाच मास्क काढतो - अजित पवार
पुणे, पिंपरी आणि जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्यांना पाचशे रुपये दंड ठेवला होता. तेंव्हा पन्नास कोटी रुपये दंड आकरला गेला. इतका नियम झुगारला. आता हे जे सापडले त्यांचा आकडा आहे. न सापडलेले किती असतील, विचार करा. तर अशी वेळ पुन्हा येऊन देऊ नका. आम्ही खूप अभ्यासपूर्वक हे सांगतोय. कृपया मास्क काढून फिरू नका. मी तर हा मास्क फक्त जेवताना, पाणी पिताना आणि रात्री झोपतानाच काढतो. नाही तर मास्क काढतच नाही. त्याला काही इलाज नाही. कारण जो पर्यंत धोका आहे तो पर्यंत काळजी घेणं आपल्याच हातात आहे.

पर्यटन विकासावर काय म्हणाले?
महाबळेश्वर धर्तीवर लोणावळ्यात पर्यटनाचा विकास करायचं आहे. पण तुमची साथ असली तर तसं इथं ही आपण करुयात. एकविरा देवी बद्दल ठाकरे कुटुंबियांची मोठी श्रद्धा आहे. तिथं रोप वे करताना, मुख्यमंत्र्यांना यायचं आहे. आपल्याला त्यांना ही आमंत्रण द्यायचं आहे. महाबळेश्वर नंतर माथेरान आणि लोणावळ्याची ओळख आहे. त्यामुळं इथल्या तरुण-तरुणींसाठी उपजीविकेची साधन उपलब्ध व्हावीत. सुरक्षित वातावरण असावं, पर्यटकांची संख्या वाढावी आणि इथं आर्थिक सुलभता यावी. म्हणून तशा उपाययोजना उपलब्ध करूयात.

मास्कवरुन उपस्थितांना सुणावलं -
कोरोनाच्या काळात बिकट अवस्था झाली. पहिल्या लाटेवेळी सव्वा लाख कोटी रुपये तिजोरीत कमी आले. बरेच कर आले नाहीत. पूर्व पदावर सगळी परिस्थिती आणायचं चाललंय. पण बाबांनो जरा काळजी घ्या. इथं तर आत्ता एकाच्या तोंडावर मास्क दिसेना, बघा-बघा त्यांचा हा मास्क तोंडाखाली आहे. एकदा कोरोना झाला की निम्मा महिना तरी घरीच जातो. म्हणून जरा मास्क वापराच.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Patil vs NCP : कवठे महांकाळमधील वादात मोठा ट्वीस्ट, संजकाकांविरोधातील तक्रार मागे घेतलीTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 08 PM : 28 September 2024 : ABP MajhaNashik : नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पणUjjwal Nikam on Vidhan Sabha Elections  : उमेदवाराची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्यास काय होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget