एक्स्प्लोर
पुण्यात पोलिसांच्या तावडीतून आरोपीचं बेड्यांसह पलायन
या आरोपीविरोधात मागील वर्षी भारतीय दंडविधान कलम 307 अंतर्गत हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.
पुणे : खेड पोलिसांच्या तावडीतून एका आरोपीने बेड्यांसह पलायन केलं. चाकण हद्दीत मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.
समाधान उर्फ सोन्या सुरेश अवताडे असं या 20 वर्षीय आरोपीचं नाव आहे. या आरोपीविरोधात मागील वर्षी भारतीय दंडविधान कलम 307 अंतर्गत हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.
याच प्रकरणात मंगळवारी त्याला खेड न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयीन प्रक्रिया संपवून खेड पोलिस त्याला येरवडा तुरुंगात घेऊन निघाले होते. त्यावेळी चाकण इथल्या ज्ञानवर्धिनी शाळेजवळ पेट्रोल भरण्यासाठी गाडीचा वेग कमी झाला. याचाच फायदा घेत सोन्या अवताडे बेड्यांसह पसार झाला.
आरोपी सोन्या अवताडे मूळचा सोलापूर जिल्ह्यातील विरवडे बुद्रुक इथला आहे. दरम्यान खेड पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement