एक्स्प्लोर
पुण्यात तब्बल 1 कोटी 11 लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त
पुणे: पुण्यातील शिवाजीनगर परिसरात 1 कोटी 11 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. जप्तीच्या रकमेत जुन्या हजार-पाचशेच्या नोटांचा समावेश आहे.
जमिनीचे व्यवहार करणारा अंकेश अग्रवाल नावाचा व्यक्ती रक्कम घेऊन एका ऑफिसमध्ये आला होता त्यावेळी पोलिसांनी कारवाई करून ही रक्कम जप्त केली.
अंकेश अग्रवाल हा जमिनी खरेदी विक्रीचे व्यवहार करतो. तो तब्बल 1 कोटी 11 लाखांची रोकड घेऊन एका खासगी ऑफिसमध्ये आला असताना पोलिसांनी ही कारवाई केली असून याप्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे. अंकेश अग्रवालला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याची माहिती आयकर विभागाला देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement