Walmik Karad : सुरेश धस, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, देवेंद्र फडणीस ते शरद पवार; वाल्मिक कराडचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत फोटो
Walmik Karad : सुरेश धस, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, देवेंद्र फडणीस ते शरद पवार; वाल्मिक कराडचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत.
Walmik Karad : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी क्रूरतेनं हत्या करण्यात आली. दरम्यान, आरोपींना अटक होत नसल्याने हे राज्यभर तापलं. बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी या प्रकरणात आवाज उठवला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, भाजप आमदार सुरेश धस हे सर्व नेते संतोष देशमुख हत्या प्रकरणात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यानंतर आरोपी वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला.
View this post on Instagram
वाल्मिक कराडचे सर्वपक्षीय नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल
त्यानंतर या प्रकरणात इतर आरोपींसह वाल्मिक कराड याला न्यायालयाने 15 आणि इतर आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, आता वाल्मिक कराडचे सर्व पक्षीय नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. विशेष म्हणजे वाल्मिक कराडवर आरोप करणारे आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्यासोबतही त्याचे फोटो आहेत. ते आता सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तीनही आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. अद्याप एक आरोपी म्हणजे कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे.
धनजंय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. मात्र, ते पोलिसांना सापडले नाहीत. शेवटी वाल्मिक कराडचं पुण्यातील सीआयडी कार्यालयात हजर झाला. त्यानंतर न्यायालयाने त्याला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर बीड सरपंच हत्या प्रकरणातील आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, वाल्मिक कराड हा धनजंय मुंडेंचा निकवर्तीय असल्याने त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या