एक्स्प्लोर

Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट, सुदर्शन घुलेसह तिन्ही आरोपींना 14 दिवसांची CID कोठडी

Santosh Deshmukh Murder Case : आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे हे तिघे गेल्या 25 दिवसांपासून फरार होते. त्यांना आता अटक करण्यात आल्याने संतोष देशमुख प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. 

बीड  : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case ) ताब्यात घेण्यात आलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तीनही आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे. केज न्यायालयाचे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस व्ही पावसकर यांनी ही शिक्षा सुनावली आहे.  या तीनही आरोपींना 25 दिवसांनंतर अटक करण्यात आली आहे. 

मस्सोजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पंचवीस दिवसानंतर, तीन मुख्य आरोपींना अटक करण्यात यश आलं आहे. फरार असलेला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेच्या मुसक्या एसआयटीच्या पथकाने बालेवाडीत आवळल्या. अद्याप या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे मात्र फरार आहे. 

संतोष देशमुखांचा ठावठिकाणा सांगणाऱ्याला अटक

आरोपींना मदत करणाऱ्या डॉ. संभाजी वायभसेंनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याच्याच चौकशीत या आरोपींचा ठावठिकाणा कळाल्याचं सांगण्यात येतंय. या दोन मुख्य आरोपींसह, हत्येच्या दिवशी सरपंचाचा ठावठिकाणा दिल्याच्या संशयाखाली कल्याणमधून सिद्धार्थ सोनवणेला ताब्यात घेतलं आहे. सिद्धार्थ सोनवणे हा मस्साजोगचाच रहिवासी आहे. सरपंचाची हत्या झाल्यानंतर तो गावातच होता. याशिवाय अंत्यविधीला देखील तो उपस्थित होता.

आरोपी कसे जाळ्यात अडकले?

या प्रकरणातील संशयित आरोपींना ज्या व्यक्तीने पळून जाण्यासाठी मदत केली, ज्यांच्या संपर्कात हे तीनही लोक होते त्यांच्याकडून पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी आणि स्पेशल टीमने त्या माहितीच्या आधारे सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला अटक केली. या दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. तर संतोष देशमुखांचा ठावठिकाणा सांगणारा तिसरा आरोपी सिद्धार्थ सोनवणेला कल्याणमधून ताब्यात घेण्यात आलं.  

मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली आणि तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचबरोबर या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी टेक्निकल टीम तयार करून या आरोपींच्या मोबाईलचे लोकेशन आणि ते ज्या लोकांच्या संपर्कात होते त्यांच्या चौकशीनंतर काही माहिती मिळवली. या तीन आरोपींनी आपले मोबाईल फोन बंद ठेवले होते. नवीन सिम कार्ड घेतले होते. पण त्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून त्यांची माहिती मिळाली आणि त्या आधारे यांना अटक केली. या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. 

ही बातमी वाचा : 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Beed FDA Raid: आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Beed Jail Walmik Karad: बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget