कल्याण लोकसभेचा सर्व्हे नेगेटिव्ह असल्यामुळे श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा झाली नसेल; वरुण सरदेसाईंनी शिंदेच्या जखमेवर मीठ चोळलं
Kalyan Lok Sabha constituency, Varun Sardesai on Shrikant Shinde : सध्याचा ट्रेंड पाहता नावाची घोषणा झाल्यानंतर देखील तिकीट कापले जात आहेत.
Kalyan Lok Sabha constituency, Varun Sardesai on Shrikant Shinde : "सध्याचा ट्रेंड पाहता नावाची घोषणा झाल्यानंतर देखील तिकीट कापले जात आहेत. त्यामुळे कल्याण लोकसभेच्या विद्यमान खासदारांना देखील शंका असेल की माझ्या सोबत असे होईल, त्यामुळे कदाचित त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जात नाही. कल्याण लोकसभेत भाजप आणि शिंदे गटाने केलेला सर्व्हे निगेटिव्ह असल्याने श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या नावाची अधिकृत घोषणा होत नाही", अशी टीका ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी केली आहे. डोंबिवलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची वरून सर्देसाई यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी ठाकरेंच्या कल्याण लोकसभेसाठीच्या उमेदवार वैशाली दरेकरही उपस्थित होत्या.
वैशाली दरेकर नक्कीच विजयी होतील
वरुण सरदेसाई म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य जनतेतील वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिलीये. त्यांनी लोकसभा मतदारसंघात चांगला संदेश दिलाय. त्यामुळे वैशाली दरेकर नक्कीच विजयी होतील, असा विश्वास सरदेसाई यांनी व्यक्त केला. मातोश्रीवर मान मिळत होता. मात्र, आज यांचं स्थान काय झालंय? आज यांना सर्व गोष्टींची जाणीव झाली असेल, असंही वरुण सरदेसाई यांनी नमूद केलं.
रश्मी वहिनी औक्षण करायच्या
पुढे बोलताना वरुण सरदेसाई म्हणाले, शिवसेना शिंदे गटाच्या सात खासदारांचे तिकीट कापलं गेलं. यावरुनही सरदेसाई यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय. एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या 13 पैकी सात खासदारांची तिकीट कापली गेली ,हा नियतीचा खेळ आहे,त्यांना पश्चाताप होत असेल उद्धव ठाकरे , मातोश्रीची आठवण येत असेल. 2014, 2019 साली या सगळ्या उमेदवारांना मातोश्रीवर बोलावलं जायचं. स्वतः ठाकरे कुटुंब उपस्थित असायचं. रश्मी वहिनी औक्षण करायच्या. त्यानंतर यांना एबी फॉर्म दिले जायचे. आता दहा दहा तास वेटिंगवर राहावे लागते. त्यानंतर देखील तिकीट मिळत नाही.
डबल अंकी जागा देखील मिळवता येत नाहीयेत
मातोश्रीवर मान मिळत होता. मात्र, आज यांचं स्थान काय झालंय? आज यांना सर्व गोष्टींची जाणीव झाली असेल. शिवसेना पुढे घेऊन जाणार असे म्हणतात. मात्र यांना डबल अंकी जागा देखील मिळवता येत नाहीयेत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांनी 21 उमेदवारांची घोषणा केली आहे, असंही वरुण सरदेसाई यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या