Diva Dumping Ground: दिवा डंपिंग ग्राउंड प्रश्नावरून भाजप आणि शिंदे गटात फूट? जाणून घ्या काय आहे प्रकरण
Diva Dumping Ground: भंडार्ली येथे डंपिंगसाठी तीन लाख 65 हजार चौरस फूट जागा घेतल्यानंतरही, दिव्यात डंपिंग ग्राऊंड बंद न झाल्याने त्यावरुन आता राजकारण पुन्हा एकदा पेटले आहे.
Diva Dumping Ground: भंडार्ली येथे डंपिंगसाठी तीन लाख 65 हजार चौरस फूट जागा घेतल्यानंतरही, दिव्यात डंपिंग ग्राऊंड बंद न झाल्याने त्यावरुन आता राजकारण पुन्हा एकदा पेटले आहे. दिवा डंपिंग ग्राऊंडच्या (Diva Dumping Ground) विरोधात सोमवारी भाजपने आंदोलन करीत, दहा दिवसात डंपिंग बंद न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे. परंतु दुसरीकडे भाजपची ही केवळ एक स्टंटबाजी असल्याचा आरोप बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक रमाकांत मढवी यांनी केला आहे. त्यामुळे राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार एकत्र असतांना स्थानिक पातळीवर त्यांच्या गटातील पदाधिकाऱ्यांचा डंपिंगच्या मुद्यावरुन संघर्ष दिसून आला आहे.
Bjp Vs Shinde Group: भाजपने केलं होत आंदोलन
मिळालेल्या माहितीनुसार, दिवा येथील डंपिंगचा प्रश्न हा ठाणे (Thane) महानगरपालिकेतील सर्वाधिक काळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांपैकी एक आहे. गेल्या अनेक वर्षात दिवा येथील डंपिंग बंद करून टायगर किंवा भंडारली येथे हलवण्याचे प्रयत्न झाले. मात्र एकही प्रयत्न आजतागायत सफल झालेला नाही. त्यात भाजपच्या वतीने दिवा डंपिंग ग्राऊंडवर तीव्र आंदोलन करण्यात आले. डंपिंग ग्राऊंडकडे येणाऱ्या गाड्या अडवून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुंबरे, मिलिंद पाटणकर, नारायण पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
Bjp Vs Shinde Group: शिंदे गटाने व्यक्त केली नाराजी
तर भाजपने केलेला या आंदोलनावर बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) पक्षाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी रोष व्यक्त केला आहे. भंडार्ली येथील निविदा प्रक्रिया सुरू असून याची जाणीव भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आहे. मात्र स्टंटबाजीसाठी त्यांनी आंदोलन केल्याची प्रतिक्रिया बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या माजी नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यन, दिवा (Diva Dumping Ground) येथे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या डंपिंग ग्राऊंडची क्षमता संपली आहे. मात्र, तेथे रोज शेकडो गाड्या कचरा टाकला जात असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. भंडार्ली प्रकल्प सुरु करुन दिव्यातील डंपिंग बंद केले जाईल, असे आश्वासन महापालिकेने दिले होते. मात्र वर्षभरानंतरही डंपिंग सुरुच असल्याने हे आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडल्याचे दिसून येत आहे.
इतर महत्वाची बातमी: