(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: जरी तेव्हा मी मुख्यमंत्री असलो तरी चूक ती चूकच, मुख्यमंत्री शिंदेंवर ठाकरे बरसले
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: यावरूनच आता उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणले आहेत की, ''जरी मी तेव्हा मुख्यमंत्री असलो तरी चूक ती चूकच.''
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: नागपूर उमरेड रस्त्यावरील मौजा हरपूर येथील जमीन प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. शिंदे हे मागील सरकारमध्ये नगर विकास विभाग सांभाळत असताना त्यांनी 16 जणांना ही जमीन लीज करारावर देण्याचे निर्देश नागपूर सुधार प्रन्यासला दिले होते. या जमिनीवरून वाद सुरु असून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. असं असतानाही त्यांनी ही जमीन लीजवर दिली, असा आरोप विरोधी पक्ष नेत्यांनी विधिमंडळात केले आहेत. यावरून आज विधिमंडळात मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यावरूनच आता उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणले आहेत की, ''जरी मी तेव्हा मुख्यमंत्री असलो तरी चूक ती चूकच.'' एका आयोजित पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ''नागपूर खंडपीठाचा आदेश गंभीर आहे. उपमुख्यमंत्र्यांनी सोपा वाटणारा तो विषय इतके दिवस कोर्टात चालला कसा. न्यायप्रविष्ठ विषय असताना त्यात हस्तक्षेप झालाय. निर्णय घेणारे आता मुख्यमंत्री आहेत. हे सर्व कायद्यानुसार झालं असेल तर मग कोर्टाने का स्थगिती दिली. जोपर्यंत निकाल लागेपर्यंत तो व्यक्ती त्या पदावर राहता कामा नये.'' ते म्हणाले, ''सरकारने आता तो निर्णय रद्द केला आहे. सरकारचा हस्तक्षेप हा गंभीर आहे. सहजतेने व लिलया उपमुख्यमंत्र्यांनी हे कथानक सांगितले. मग कोर्टात का चालला इतका वेळ हा विषय.''
'चोरी केली तर चोरीच आहे'
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, त्यांच्या अखत्यारीत हा निर्णय झाला. अजूनही ते नगरविकास मंत्री आहेत. जरी मी तेव्हा मुख्यमंत्रीअसलो तरी चूक ती चूकच. ज्यांनी जेलमध्ये टाकले त्यांच्यासोबत ते आहेत. चोरी केली तर चोरीच आहे, मुद्द्याचे बोलावे, असं ते म्हणाले. बेळगावच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, ''तेव्हा लाठीकाट्या म्हणजे आता गप्प बसता कामा नये. तिथले लोक अत्याचार भोगतायत.''
'आमचा मोर्चा फडणवीस स्टाईल होता'
राज्यपालांबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला लाज असती तर राम राम घ्यायला हवा होता. आमचा मोर्चा फडणवीस स्टाईलचा होता. सावित्रीबाई बद्दल ते बोलले हे आमचे नॅरेटीव्ह नव्हते, लोढा आमचे नाहीत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Nagpur NIT Plot Case : ज्यावरून मुख्यमंत्र्यांवर आरोप होतायत, त्या जमिनीचं प्रकरण नेमकं आहे तरी काय?