एक्स्प्लोर

Sanjay Raut on Kalyan Incident: मोदी-शाह-फडणवीसांना मुंबई व्यापारी आणि बिल्डर्सच्या घशात घालायची आहे, मराठी माणसांची ताकद नष्ट करण्याचे प्रयत्न: संजय राऊत

Marathi Family beaten: विधानसभा निवडणुकीनंतर मराठी माणसांवरील हल्ले वाढले आहेत. मराठी माणसाला दुय्यम वागणूक देण्याचा डाव. कल्याणमधील घटनेनंतर संजय राऊतांची महायुती सरकारवर टीका.

मुंबई: कल्याणमध्ये परप्रांतीयांकडून मराठी माणसांवर हल्ले केले जात आहेत. मराठी माणसं घाणेरडी आहत, त्यांना जगण्याचा अधिकार नाही, असं बोललं जातंय. मराठी माणसाला शिव्या घातल्या जात आहेत. मुंबईचं गुजरातीकरण आणि उत्तर भारतीयीकरण सुरु आहे. मोदी, शाह आणि देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) मुंबईत मराठी माणसाला दुय्यम वागणूक द्यायची आहे. त्यांना मुंबई ही व्यापारी आणि बिल्डर्सच्या घशात घालायची आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.

कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला अखिलेश शुक्ला या सरकारी अधिकाऱ्याने गुंडांकरवी मारहाण केली होती. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना महायुती सरकारवर टीकेची तोफ डागली. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या हक्कासाठी महाराष्ट्रात शिवसेना निर्माण केली. नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी शिवसेना पक्ष फोडून मराठी माणूस कमजोर केला. मराठी माणसाला मुंबईत दुय्यम दर्जा मिळावा आणि त्यांची ताकद नष्ट व्हावी, हीच मोदी-शाह आणि फडणवीसांची इच्छा असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

त्यांना ही मुंबई अदानी, लोढा आणि गुंडेचा या बिल्डर्सच्या घशात घालायची आहे. त्यासाठी मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांचा गोतावळा काम करत आहे. विधानसभेच्या निकालानंतर मराठी माणसांवरील हल्ले वाढले आहेत. मराठी माणसांना मुंबईतून घालवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आता कल्याणमध्येही मराठी माणूस नकोसा झाला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी शिवसेना ज्यांच्या हातात दिली, ते नामर्द आहेत, ते सरकारमध्ये बसले आहेत. त्यांना कल्याणच्या घटनेची वेदना टोचतेय का? मुंबईचं गुजरातीकरण आणि उत्तरभारतीयीकरण केलं जातं आहे. कल्याणमधील कालच्या हल्ल्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाची माफी मागितली पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले. राज ठाकरे यांची मनसे याबाबत काहीच भूमिका घेणार नाही. ते भाजपची भूमिका पुढे नेत आहेत. या सगळ्यांना स्वत:ला मराठी म्हणवून घ्यायला लाज वाटली पाहिजे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. यावर आता महायुती सरकार आणि भाजपकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

आणखी वाचा

मराठी माणूस जागा झाला! परप्रांतीयांकडून देशमुख कुटुंबाला मारहाण, कल्याणमध्ये वातावरण तापलं, अजमेरा हाईटसमध्ये घोषणाबाजी

फेक IAS शुक्लाचा माज उतरवण्यासाठी आता मनसे मैदानात, वॉर्निंगच दिली; 24 तासांत अटक करा अन्यथा....

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: लग्नातील लाखोंच्या खर्चाला फाटा दिला अन् दोघांनी मिळून त्याच खर्चात नवा फ्लॅट घेतला अन् त्याच फ्लॅटमध्ये मोजक्या लोकांमध्ये लग्नाची गाठ बांधली!
Video: लग्नातील लाखोंच्या खर्चाला फाटा दिला अन् दोघांनी मिळून त्याच खर्चात नवा फ्लॅट घेतला अन् त्याच फ्लॅटमध्ये मोजक्या लोकांमध्ये लग्नाची गाठ बांधली!
Insta Girl Honeytrap: इन्स्टावालीनं प्रेमानं बोलवताच भावड्याची कळी खुलली अन् गेला भेटायला; पुढच्या 15 तासात जे व्हायचं तेच झालं!
इन्स्टावालीनं प्रेमानं बोलवताच भावड्याची कळी खुलली अन् गेला भेटायला; पुढच्या 15 तासात जे व्हायचं तेच झालं!
एकनाथ शिंदेंकडून कडक समज, संजय शिरसाठांची नाराजी दूर; संभाजीनगरमध्ये महापौर भाजप, उपमहापौरपदी शिवसेनेचा 'हा' नेता
एकनाथ शिंदेंकडून कडक समज, संजय शिरसाठांची नाराजी दूर; संभाजीनगरमध्ये महापौर भाजप, उपमहापौरपदी शिवसेनेचा 'हा' नेता
अमरावतीत ट्विस्ट, भाजपला MIM च्या नगरसेवकाने दिलं मत, गटनेता बघतच राहिला; मीराबाई कांबळे म्हणाल्या...
अमरावतीत ट्विस्ट, भाजपला MIM च्या नगरसेवकाने दिलं मत, गटनेता बघतच राहिला; मीराबाई कांबळे म्हणाल्या...

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: लग्नातील लाखोंच्या खर्चाला फाटा दिला अन् दोघांनी मिळून त्याच खर्चात नवा फ्लॅट घेतला अन् त्याच फ्लॅटमध्ये मोजक्या लोकांमध्ये लग्नाची गाठ बांधली!
Video: लग्नातील लाखोंच्या खर्चाला फाटा दिला अन् दोघांनी मिळून त्याच खर्चात नवा फ्लॅट घेतला अन् त्याच फ्लॅटमध्ये मोजक्या लोकांमध्ये लग्नाची गाठ बांधली!
Insta Girl Honeytrap: इन्स्टावालीनं प्रेमानं बोलवताच भावड्याची कळी खुलली अन् गेला भेटायला; पुढच्या 15 तासात जे व्हायचं तेच झालं!
इन्स्टावालीनं प्रेमानं बोलवताच भावड्याची कळी खुलली अन् गेला भेटायला; पुढच्या 15 तासात जे व्हायचं तेच झालं!
एकनाथ शिंदेंकडून कडक समज, संजय शिरसाठांची नाराजी दूर; संभाजीनगरमध्ये महापौर भाजप, उपमहापौरपदी शिवसेनेचा 'हा' नेता
एकनाथ शिंदेंकडून कडक समज, संजय शिरसाठांची नाराजी दूर; संभाजीनगरमध्ये महापौर भाजप, उपमहापौरपदी शिवसेनेचा 'हा' नेता
अमरावतीत ट्विस्ट, भाजपला MIM च्या नगरसेवकाने दिलं मत, गटनेता बघतच राहिला; मीराबाई कांबळे म्हणाल्या...
अमरावतीत ट्विस्ट, भाजपला MIM च्या नगरसेवकाने दिलं मत, गटनेता बघतच राहिला; मीराबाई कांबळे म्हणाल्या...
Pakistan Attack: पाकिस्तानात शिया मशिदीत नमाज दरम्यान आत्मघाती हल्ल्यात मृत्यूचं तांडव; 31 ठार, 169 गंभीर जखमी; राजधानी इस्लामाबादमध्ये आणीबाणी जाहीर
पाकिस्तानात शिया मशिदीत नमाज दरम्यान आत्मघाती हल्ल्यात मृत्यूचं तांडव; 31 ठार, 169 गंभीर जखमी; राजधानी इस्लामाबादमध्ये आणीबाणी जाहीर
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी गुड न्यूज, ई-केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी, 31 मार्चपर्यंत पोर्टल सुरु, जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार?
जानेवारीच्या 1500 रुपयांच्या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहि‍णींसाठी गुड न्यूज, ई-केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी, तारखा जाहीर
Parliament Budget Session: लोकसभेत गोंधळ आणि घोषणाबाजी सुरुच; कामकाज 9 फेब्रुवारीपर्यंत स्थगित; फक्त 10 मिनिटे कामकाज
लोकसभेत गोंधळ आणि घोषणाबाजी सुरुच; कामकाज 9 फेब्रुवारीपर्यंत स्थगित; फक्त 10 मिनिटे कामकाज
तुम्ही मेले की 10 दिवस... शेकापच्या जयंत पाटलांवर बोलताना रुपाली ठोंबरेंची जीभ घसरली; अंजली दमानियांना शूर्पणखेची उपमा
तुम्ही मेले की 10 दिवस... शेकापच्या जयंत पाटलांवर बोलताना रुपाली ठोंबरेंची जीभ घसरली; अंजली दमानियांना शूर्पणखेची उपमा
Embed widget