एक्स्प्लोर

Kalyan Marathi family beaten: मराठी माणूस जागा झाला! परप्रांतीयांकडून देशमुख कुटुंबाला मारहाण, कल्याणमध्ये वातावरण तापलं, अजमेरा हाईटसमध्ये घोषणाबाजी

Marathi family beaten in Kalyan: कल्याणमध्ये अखिलेश शुक्ला यांनी गुंड बोलावून देशमुख कुटुंबीयांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्याणच्या योगीधाम परिसरातील घटना.

कल्याण: मराठी माणसांविषयी अपमानजनक शेरेबाजी करणाऱ्या कल्याणमधील अखिलेश शुक्ला यांच्याविरोधात गुरुवारी रात्री कल्याण परिसरात वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. कल्याण येथील योगीधाम परिसरात (Kalyan Yogidham) अजमेरा हाईट्स या इमारतीमध्ये राहणाऱ्या देशमुख कुटुंबीयांना शुक्ला यांनी काही गुंड बोलावून मारहाण केली होती. अभिजीत देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख या दोघांना परप्रांतीयांच्या टोळक्याकडून लोखंडी रॉडने मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी रात्री कल्याणच्या योगीधाम परिसरात मराठी माणसांचा संताप पाहायला मिळाला. 

या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मराठी माणसांनी एकत्र येऊन योगीधाम परिसरामध्ये बॅनर लावून निषेध केला. यावेळी योगीधाम परिसरात मराठी माणसांनी गर्दी केली होती. या जमावाने अजमेरा हाईटस् (Ajmera Heights Kalyan) इमारतीमध्ये जाऊनही घोषणाबाजी केली. हल्लेखोराला अटक केली नाही तर योगीधाम परिसरातील व्यापारी संघटनानी बंदची घोषणा केली आहे. संबंधित घटनेमध्ये कल्याण खडकपाडा पोलिसांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. योग्य कारवाई केली असल्याची माहिती खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबरनाथ वाघमोडे यांनी दिली आहे. दरम्यान, आता पोलिसांकडून एमटीडीसीमध्ये अकाऊटंट असलेल्या मुजोर अखिलेश शुक्ला आणि त्याच्या कुटुंबावर काय कारवाई केली जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

नेमकं काय घडलं होतं?

कल्याणच्या योगीधाम परिसरात असणाऱ्या अजमेरा हाईटस् या उच्चभ्रू रहिवाशांच्या सोसायटीत हा प्रकार घडला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC मध्ये अकाऊंटंट मॅनेजर असलेले अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे अजमेरा सोसायटीत आजूबाजूला राहतात.  नेहमीप्रमाणे अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करुन धूप लावतात. या धूपाचा प्रचंड धूर होतो. हा धूर वर्षा कळवीकट्टे यांच्या घरात जायचा.  या धुराचा घरात असलेल्या तीन वर्षाच्या बाळाला त्रास व्हायचा. तसेच घरात असलेली वयोवृद्ध आईलाही दम लागायचा. त्यामुळे कळवीकट्टे कुटुंबीयांनी शुक्ला यांना बाहेर धूप न लावण्याविषयी विनंती केली होती. यावरुन अखिलेश शुक्ला यांची पत्नी गीता शुक्ला यांनी उद्दामपणे कळवीकट्टे कुटुंबीयांशी वाद घालायला सुरुवात केली. 

हा वाद सुरू असताना बाजूला राहणारे अभिजीत देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख यांनी वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. देशमुख यांनी वाद सोडण्याचा प्रयत्न केला.  याचा राग  शुक्ला याला आला आणि शुक्लाने 10 ते 15 गुंडांना  बोलावून देशमुख बंधूंना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या घटनेत अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. शुक्ला हे या सोसायटीत वादग्रस्त असल्याचे समोर आले आहे.  अनेक मराठी माणसांना शुक्ला याने त्रास दिला आल्याचा आरोप सोसायटीतील नागरिकांनी केला आहे. 

मराठी माणसांविषयी अपमानजनक बोलण्याची शुक्लांना सवय

अखिलेश शुक्ला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी यापूर्वीही अनेकदा मराठी माणसांविषयी अपमानजक शेरेबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे. तुम्ही मराठी माणसे घाण आहात तुमचा वास येतो. तुम्ही मांसमच्छी खाणारे आहात. तुमच्या सारखे मराठी माझ्याकडे झाडू मारायला आहेत, अशी शेरेबाजी शुक्ला कुटुंबीयांनी केल्याची माहिती समोर येत आहे. 

अखिलेश शुक्ला हे एमटीडीसीमध्ये साधे अकाऊंटंट आहे. मात्र, ते आपण IAS अधिकारी असल्याचे सांगून सोसायटीमधील रहिवाशांना धमकावायचे. तसेच ते खासगी गाडीवर  IAS अंबर दिवा लावून फिरायचे. त्या गाडीचा इन्शुरन्सही 10 मार्च 2020 रोजी संपल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पोलीस याप्रकरणात काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

आणखी वाचा

खासगी गाडीवर अंबर दिवा, IAS असल्याचा खोटा प्रचार; गुंडांकरवी मराठी माणसांना मारणाऱ्या हिंदी भाषिक MTDC अकाउंटट मॅनेंजरचा 'कार'नामा समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
NACDAC IPO : 10  कोटींच्या आयपीओवर पैशांचा पाऊस, 14386 कोटी रुपयांची बोली, SME IPO तब्बल 1976 पट सबस्क्राइब
10 कोटींच्या आयपीओसाठी तब्बल 14386 कोटी रुपयांची बोली, SME IPO 1976 पट सबस्क्राइब
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी Chhagan Bhujbal यांची मुलाखत  EXCLUSIVE
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखत
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 20 डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  20 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :20 डिसेंबर 2024 : ABP MajhaAlmatti Dam Special Report : अलमट्टीच्या धोक्याचा खरा अभ्यास कधी होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
NACDAC IPO : 10  कोटींच्या आयपीओवर पैशांचा पाऊस, 14386 कोटी रुपयांची बोली, SME IPO तब्बल 1976 पट सबस्क्राइब
10 कोटींच्या आयपीओसाठी तब्बल 14386 कोटी रुपयांची बोली, SME IPO 1976 पट सबस्क्राइब
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी Chhagan Bhujbal यांची मुलाखत  EXCLUSIVE
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखत
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Kalyan Marathi family beaten: मराठी माणूस जागा झाला! परप्रांतीयांकडून देशमुख कुटुंबाला मारहाण, कल्याणमध्ये वातावरण तापलं, अजमेरा हाईटसमध्ये घोषणाबाजी
मराठी माणूस जागा झाला! परप्रांतीयांकडून देशमुख कुटुंबाला मारहाण, कल्याणमध्ये वातावरण तापलं, अजमेरा हाईटसमध्ये घोषणाबाजी
Dinga Dinga Disease VIDEO : लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Nanded Suicide : मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भीतीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भीतीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
Embed widget