एक्स्प्लोर

Raj Thackeray : मोठी बातमी : राज ठाकरे यांच्याविरोधात न्यायालयाकडून अटक वारंट जारी, 16 वर्षांपूर्वीचं प्रकरण

Raj Thackeray, लातूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात न्यायालयाकडून अटक वारंट जारी करण्यात आले आहे. सोळा वर्षांपूर्वीच्या प्रकरणात राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयाचे पकड वॉरंट जारी केलंय.

Raj Thackeray, लातूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात न्यायालयाकडून अटक वारंट जारी करण्यात आले आहे. सोळा वर्षांपूर्वीच्या प्रकरणात राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयाचे पकड वॉरंट जारी केलंय. महामंडळाची बसगाडीची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली होती. याबाबतचे हे प्रकरण आहे. 

राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयात हजर रहावे लागणार 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज श्रीकांत ठाकरे यांना निलंगा येथील दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शुक्रवारी  (अजामीनपात्र) अटक वॉरंट जारी केले आहे. यामुळे राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयात हजर रहावे लागणार आहे. यापूर्वी ही काही वर्षांपूर्वी ते याच प्रकरणी निलंगा न्यायालयात हजर झाले होते. सोळा वर्षापूर्वी मनसे कार्यकर्त्यांकडून महामंडळाच्या बसगाडीची जाळपोळ तोडफोड  केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. 

2008 मध्ये  उदगीर मोडवरती महामंडळाच्या बसगाडीची जाळपोळ 

निलंगा येथील मनसे कार्यकर्त्यांनी  2008 मध्ये  उदगीर मोडवरती महामंडळाच्या बसगाडीची जाळपोळ केली होती. याप्रकरणी निलंगा पोलिस ठाण्यात आठ जणावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये राज ठाकरे यांचा समावेश होता. यापूर्वी निलंगा न्यायालयाने जामिन रद्द केल्याने त्यांना निलंगा येथील न्यायालयात हजर रहावे लागले होते.  वकीलांनी राज ठाकरे यांना प्रत्येक तारखेला निलंगा न्यायालयात येणे शक्य नसल्याने हे प्रकरण वर्ग करण्याची विनंती केली होती. त्यावेळी त्यांना जामीनही दिला होता. मात्र तारखेला हजर राहात नसल्यामुळे न्यायालयाने पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणातील तत्कालीन तालुका प्रमुख आणि इतर तीन जण शुक्रवारी न्यायालयात हजर झाले होते. त्यांचे काढलेले वॉरंट विना तामील झाले होते त्यामुळे न्यायालयाने चौघांचा जामीन रद्द केला होता.

जिल्हाप्रमुख अभय सोळुंके हजर राहत नसल्यामुळे त्यांना पुन्हा अटक वॉरंट जारी  

पुन्हा न्यायालयाने दंड लावला आणि नवीन जामीन देण्याचा आदेश चौघांना दिला होता. रितसर वकिलामार्फत काल जामीन  मिळाला आहे. मात्र राज ठाकरे आणि मनसेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख अभय सोळुंके हजर राहत नसल्यामुळे त्यांना पुन्हा (अजामीनपात्र) अटक वॉरंट जारी केले असल्यामुळे पोलिसांना त्यांना निलंगा न्यायालयात हजर करावे लागणार आहे. येथील न्यायालयाने राज ठाकरे आणि अभय सोळूंके यांना हजर करा असे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सहा वर्षानंतर राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयात हजर रहावेच लागणार आहे. चिथावणीखोर भाषण दिले म्हणून ते या प्रकरणातील आठवे आरोपी आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

BJP : राष्ट्रवादीमुळे भाजपाचं वाटोळं झालं, राष्ट्रवादीशी युती का केली हे कळायला मार्ग नाही; भाजप जिल्हाध्यक्षाचा पक्षाला घरचा आहेर

महत्त्वाच्या बातम्या

कायदा तपासूनच आम्ही हा निर्णय घेतलाय, खासदार देशमुखांचा ठाकरेंना टोला, म्हणाले आम्ही कायदेशीर लढाई लढण्यास तयार 
कायदा तपासूनच आम्ही हा निर्णय घेतलाय, खासदार देशमुखांचा ठाकरेंना टोला, म्हणाले आम्ही कायदेशीर लढाई लढण्यास तयार
पिसाळलेला श्वान चावला की माणूसही त्या श्वानाप्रमाणे बोलतो, तटकरेंचा रामदास कदमांवर पलटवार, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी त्यांना रुग्णालयात दाखवावं
पिसाळलेला श्वान चावला की माणूसही त्या श्वानाप्रमाणे बोलतो, तटकरेंचा रामदास कदमांवर पलटवार, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी त्यांना रुग्णालयात दाखवावं
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Shivsena : मोठी बातमी! ठाकरेंच्या फुटलेल्या सहा खासदारांची खासदारकी वाचली, शिंदेंच्या शिवसेनेत विलिनीकरणाला मंजुरी 
मोठी बातमी! ठाकरेंच्या फुटलेल्या सहा खासदारांची खासदारकी वाचली, शिंदेंच्या शिवसेनेत विलिनीकरणाला मंजुरी 

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget