Devendra Fadnavis on Team India : फॉर्म हा टेम्पररी असतो, मात्र क्लास परमनंट; देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत मांडला टीम इंडियाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव
भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला चार विकेट्सने पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद जिंकले.

India won the Champions Trophy 2025 : भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला चार विकेट्सने पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद जिंकले. न्यूझीलंडने भारताला जिंकण्यासाठी 252 धावांचे लक्ष्य दिले, जे टीम इंडियाने सहज पार केले. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला आणि एकही सामना न गमावता विजेतेपद जिंकले. टीम इंडियासाठी रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी आणि श्रेयस अय्यर यांनी दमदार कामगिरी केली.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या विजयानंतर सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे. चाहते नाचत आणि ढोल वाजवून संघाच्या विजयाचा आनंद साजरा करत आहेत. भारताच्या विजयानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात संघाचा अभिनंदन प्रस्ताव मांडला. तो ठराव एकमताने मंजूर झाला.
JADEJA FINISHES OFF IN STYLE! 🇮🇳
— Star Sports (@StarSportsIndia) March 9, 2025
TEAM INDIA WIN THE CHAMPIONS TROPHY 2025 🏆#ChampionsTrophyOnJioStar #INDvNZ #ChampionsTrophy pic.twitter.com/ismVCQQndD
विधिमंडळात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने आपले वर्चस्व सिद्ध करत ट्रॉफी जिंकली आहे. आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. कर्णधार रोहित शर्मा व प्रशिक्षक गौतम गंभीर यांची प्रचंड मेहनत आहे. नेहमीची स्टाईल बदलून रोहितने पिचवर टिकून 76 धावा निर्णायक धावा काढल्या आणि असंख्य क्रिकेट प्रेमींना ही मोठी भेट आहे. लागोपाठ 2 आयसीसी ट्रॉफी जिंकणारा भारत हा एकमेव देश ठरला आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीबद्दल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
अनेक टीकाकार रोहित आणि विराटवर बोलत होते, पण फॉर्म हा टेम्पररी असतो, मात्र क्लास परमनंट असतो, ते विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या कडून पाहायला मिळाले. अनुभवी पण यंग असे खेळाडू दिसले. वरुण चक्रवर्ती हा आपल्या शालेय जीवनात क्रिकेट खेळला पण ते आर्किटेक्ट झाले, पण त्यांच्या रक्तात क्रिकेट होते. त्यांच्या फिरती पुढे सगळे फेल ठरले.वरुण किंवा कुलदीप यादव यांनी महत्त्वाचे विकेट काढत किंवा संघाला अडचणीत आणले. संघाला बांधण्याचे काम केले, काही युवा तर काही अनुभवी असा हा उत्तम संघ होता, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांकडून भारतीय संघाचं तोंडभरुन कौतुक - पाहा व्हिडिओ
हे ही वाचा -





















