एक्स्प्लोर

मोठी बातमी! हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील मानेंचा पत्ता कट? शिवसेनेकडून निवेदिता मानेंची तयारी सुरू

Nivedita Mane : शिवसेनेचे हातकणंगल्याचे उमेदवार धैर्यशील माने यांची उमेदवारी मागे घेऊन त्या ठिकाणी त्यांच्या आई निवेदिता माने यांना उमेदवारी देण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. 

मुंबई: राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असून एकनाथ शिंदेंच्या सहा खासदारांचा पत्ता कट होण्याची चर्चा आहे. हिंगोलीमध्ये हेमंत पाटील आणि हातकणंगल्यामधून धैर्यशील माने (Dhairyasheel Mane)  यांच्या नावाला भाजपचा विरोध लक्षात घेता हे दोन्ही उमेदवार बदलण्याची नामुष्की शिंदेंवर येणार असल्याची माहिती आहे. त्यातच आता धैर्यशील मानेंच्या ठिकाणी त्यांच्या आई माजी खासदार निवेदिता माने (Nivedita Mane) यांची निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं समोर येतंय.

शिवसेना शिंदे गटाकडून राज्यातल्या आठ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि हातकणंगल्याचे खासदार धैर्यशील माने यांच्या नावाचा समावेश होता. या दोन्ही नावांना भाजपचा कडाडून विरोध आहे. त्यामुळे आता या दोन्ही ठिकाणचे उमेदवार मागे घेण्यात येणार असून त्या ठिकाणी नवीन चेहरे देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. 

निवेदिता माने निवडणूक लढवणार? 

धैर्यशील माने यांची उमेदवारी मागे घेऊन त्या ठिकाणी माजी खासदार निवेदिता माने यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली शिंदे गटात सुरू असल्याची माहिती आहे. निवेदिता मानेंनीही त्याची तयारी सुरू केल्याचं दिसतंय. निवेदिता माने या धैर्यशील माने यांच्या आई असून त्यांनी या आधी दोन वेळा हातकणंगले मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे. 

निवेदिता माने या आधी दोनवेळा खासदार

या आधी अस्तित्वात असलेल्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून निवेदिता माने या 1999 आणि 2004 साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार होत्या. त्यानंतर 2009 साली राजू शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर 2014 सालीही राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी, धैर्यशील माने यांनी त्यांच्या आई, निवेदिता माने यांच्या पराभवाचे उट्टे काढत राजू शेट्टी यांचा पराभव केला होता. 

उमेदवार बदलण्याची शिंदेंवर नामुष्की? 

शिवसेनेच्या फुटीनंतर धैर्यशील माने यांनी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र सुरुवातीपासूनच या मतदारसंघातील उमेदवार बदलावा अशी मागणी भाजपकडून सातत्याने केली जात होती. धैर्यशील माने यांच्याबद्दल लोकांमध्ये नाराजी असल्याचं सांगत भाजपने त्यांच्या नावाला विरोध केला होता. 

भाजपचा विरोध असला तरी एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा धैर्यशील माने यांनाच संधी दिली. पण आता त्यांची उमेदवारी मागे घ्यावी लागते की काय अशी परिस्थिती आहे. कोणत्याही स्थितीत हातकणंगल्याचा उमेदवार बदलावा अशी मागणी भाजपने केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंवर उमेदवारी बदलण्य़ासाठी मोठा दबाव आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Walmik Karad : काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
Bangladesh Squad Champions Trophy : बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEOEknath Shinde Sports Car : सिंघानियांनी गरगर कार फिरवली..एकनाथ शिंदे म्हणाले, मला भीती वाटते!Thane Eknath Shinde At Raymond vintage Car Exhibition : एकनाथ शिंदे यांनी अनुभवलं कार ड्रिफ्टिंगSanjay Raut Full PC : कुणाला मिरच्या लागण्याचे कारण नाही;काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Walmik Karad : काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
Bangladesh Squad Champions Trophy : बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचं घडलंय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या दादांवर फैरींवर फैरी!
दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या फैरींवर फैरी!
Suresh Dhas : राखेची वाहतूक करताना परळीमध्ये सरपंचाचा अपघातात बळी, आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'पोलीस आणि थर्मल पॉवर अधिकारी...'
राखेची वाहतूक करताना परळीमध्ये सरपंचाचा अपघातात बळी, आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'पोलीस आणि थर्मल पॉवर अधिकारी...'
कोयता गँगचे टोळके ॲक्टीव्ह! रात्रीच्या अंधारात हातात कोयता घेऊन येतात अन्.. संभाजीनगरमध्ये दहशत वाढली
कोयता गँगचे टोळके ॲक्टीव्ह! रात्रीच्या अंधारात हातात कोयता घेऊन येतात अन्.. संभाजीनगरमध्ये दहशत वाढली
IRCTC Down : आयआरसीटीसीची वेबसाईट वारंवार डाऊन, रेल्वे प्रवासी त्रस्त, सोशल मीडियावर रोष व्यक्त
आयआरसीटीसीची वेबसाईट वारंवार डाऊन, रेल्वे प्रवासी त्रस्त, सोशल मीडियावर रोष व्यक्त
Embed widget