Sharad Pawar : महाविकास आघाडीतील मित्रपक्षात जागावाटपावरून कोणतेही मतभेद नाही : शरद पवार
महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीतील मित्रपक्षात जागावाटपावरून कोणतेही मतभेद नाही. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
मुंबई : आज मुंबईत महाविकास आघाडीती (MVA) पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीतील जागावाटपाचा (Maha Vikas Aghadi Seat Sharing Sormula Announced) तिढा आता सुटला आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्षात जागावाटपावरून कोणतेही मतभेद नाही. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली. या सगळ्या जागा आम्ही एकमतानं जाहीर करत असल्याचं म्हणाले.
या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील, संजय राऊत, पृथ्वीराज चव्हाण, आमदार कपिल पाटील उपस्थित होते. उद्धव ठाकरे (शिवसेना) 21, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) 10 आणि काँग्रेस 17 जागांवर लढणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सांगली, भिवंडी आणि मुंबईतील जागेवर महाविकास आघाडीमध्ये पेच होता. हा पेच आता सुटला असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं आहे.
शिवसेना - 21
जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे,रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकलंगणे, संभाजीनगर, शिर्डी,सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य
काँग्रेस - 17
नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली -चिमूर, चंद्रपूर, नांदेड,जालना, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, मुंबई-उत्तर, मुंबई-उत्तर मध्य
राष्ट्रवादी - 10
बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड
मोदींनी स्वत: जवळ चायनीझ माल ठेवावा; उद्धव ठाकरे
याच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला. 'भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा' असा भाजप पक्ष झाला असल्याची बोचरी टीका उद्धव यांनी केली. जेव्हा शिवसेना निर्माण झाली,तेव्हा ते मोदी हिमालयात असतील. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना खरी शिवसेना माहित आहे. त्यांनी त्यांच्याजवळ चायनीझ माल ठेवावा असा चिमटाही ठाकरे यांनी काढला. भाजप पक्ष खंडणीखोर झाला असून चंदा दो धंदा लो असे यांचे काम आहे. खंडणीखोर नेत्यांनी असे शिवसेनेला हिणवणे योग्य नाही, असंही ठाकरे म्हणाले.
इतर महत्वाची बातमी-
महाविकास आघाडीचा 21-17-10 फॉर्म्युला जाहीर, कोण कुठल्या जागेवर लढणार?
पाहा व्हिडीओ : UBT Seat on MVA : महाविकास आघाडीत ठाकरे गटाला किती जागा? सांगलीची जागा कोणाला मिळाली?