महाविकास आघाडीचा 21-17-10 फॉर्म्युला जाहीर, कोण कुठल्या जागेवर लढणार?
MVA Seat Sharing Formula : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि शरद पवार यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीसंदर्भातील तयारीची माहिती दिली.
MVA Seat Sharing Formula : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा (Maha Vikas Aghadi Seat Sharing Sormula Announced) तिढा अखेर सुटला आहे. गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि शरद पवार यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीसंदर्भातील तयारीची माहिती दिली. त्यावेळी त्यांनी फॉर्मुलाही जाहीर केला. उद्धव ठाकरे (शिवसेना) 21, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) 10 आणि काँग्रेस 17 जागांवर लढणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सांगली, भिवंडी आणि मुंबईतील जागेवर महाविकास आघाडीमध्ये पेच होता. आज अखेर याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे. सांगलीची जागा उद्धव ठाकरे यांनाच मिळाली आहे.
महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या सांगली, भिवंडी आणि मुंबई लोकसभा मतदारसंघाचा देखील तिढा सुटला आहे. ज्यात सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Lok Sabha Constituency) ठाकरे गटाकडेच राहणार आहे, भिवंडी लोकसभा मतदारसंघ (Bhiwandi Lok Sabha Constituency) शरद पवार गटाकडे आणि मुंबई-उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ (Mumbai-North Central Lok Sabha Constituency) काँग्रेसकडे (Congress) राहणार आहे.
शिवसेना - 21
जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे,रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकलंगणे, संभाजीनगर, शिर्डी,सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य
काँग्रेस - 17
नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली -चिमूर, चंद्रपूर, नांदेड,जालना, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, मुंबई-उत्तर, मुंबई-उत्तर मध्य
राष्ट्रवादी - 10
बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड
कोणत्या जागेवर महाविकास आघाडीचा कोणता उमेदवार मैदानात ?
मतदारसंघ | ठाकरे गट | काँग्रेस | शरद पवार गट |
नंदुरबार | गोवाल पाडवी | ||
धुळे | |||
जळगाव | करण पवार | ||
रावेर | रवींद्र पाटील (संभाव्य) | ||
बुलडाणा | नरेंद्र खेडेकर | ||
अकोला | अभय पाटील | ||
अमरावती | बळवंत वानखेडे | ||
वर्धा | अमर काळे | ||
रामटेक | रश्मी बर्वे | ||
नागपूर | विकास ठाकरे | ||
भंडारा-गोंदिया | डॉ. प्रशांत पडोळे | ||
गडचिरोली-चिमूर | डॉ. नामदेव किरसान | ||
चंद्रपूर | प्रतिभा धानोरकर | ||
यवतमाळ - वाशिम | संजय देशमुख | ||
हिंगोली | नागेश पाटील आष्टीकर | ||
नांदेड | वसंतराव बळवंतराव चव्हाण | ||
परभणी | संजय जाधव | ||
जालना | |||
संभाजीनगर | चंद्रकांत खैरे | ||
दिंडोरी | भास्करराव भगरे | ||
नाशिक | राजाभाई वाजे | ||
पालघर | भारती कामडी | ||
भिवंडी | सुरेश म्हात्रे | ||
कल्याण | वैशाली दरेकर | ||
ठाणे | राजन विचारे | ||
मुंबई-उत्तर | |||
मुंबई - उत्तर पश्चिम | अमोल कीर्तीकर | ||
मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व) | संजय दिना पाटील | ||
मुंबई उत्तर मध्य | |||
मुंबई दक्षिण मध्य | अनिल देसाई | ||
दक्षिण मुंबई | अरविंद सावंत | ||
रायगड | अनंत गीते | ||
मावळ | संजोग वाघेरे-पाटील | ||
पुणे | रविंद्र धंगेकर | ||
बारामती | सुप्रिया सुळे | ||
शिरुर |
डॉ. अमोल कोल्हे
|
||
अहमदनगर | निलेश लंके | ||
शिर्डी | भाऊसाहेब वाघचौरे | ||
बीड | बजरंग सोनवणे | ||
धाराशिव | ओमराजे निंबाळकर | ||
लातूर | शिवाजीराव काळगे | ||
सोलापूर | प्रणिती शिंदे | ||
माढा | |||
सांगली | चंद्रहार पाटील | ||
सातारा | शशिकांत शिंदे | ||
रत्नागिरी-सिंधुदुर्ग | विनायक राऊत | ||
कोल्हापूर | शाहू महाराज छत्रपती | ||
हातकणंगले | सत्यजीत पाटील |