एक्स्प्लोर

काँग्रेस आणि ठाकरे गटात दक्षिण मध्य मुंबईवरुन तिढा कशामुळे? काय आहेत कारण?

Mumbai South Central Lok Sabha : गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरुन रस्सीखेच सुरु आहे.

Mumbai South Central Lok Sabha : गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरुन रस्सीखेच सुरु आहे. यामध्ये सांगली आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेचा समावेश आहे. मात्र, काँग्रेस आणि ठाकरे गटात दक्षिण मध्य मुंबईच्या (Mumbai South Central Lok Sabha) जागेबाबत तिढा कशामुळे वाढला? जाणून घेऊयात... 

दक्षिण मध्य मुंबई लोकसभेबाबत ठाकरे गटानं काय म्हटलं?

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ (Mumbai South Central Lok Sabha) हा एक प्रकारे शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं मत शिवसेना ठाकरे गटाचं आहे. याच लोकसभा मतदारसंघात शिवसेना भवन, दादर, माहीम प्रभादेवी मधील मराठी मतदार  हा वर्षानुवर्ष शिवसेनेचा आहे.  आपली ताकद या लोकसभा मतदारसंघामध्ये असल्याचे ठाकरे गटाने पुढे येऊन सांगितलंय.  या लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना ठाकरे गटाने  राज्यसभेचे माजी खासदार अनिल देसाई यांचे नाव जाहीर केलं आहे. तर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा (Mumbai South Central Lok Sabha) मतदारसंघ हा काँग्रेस पक्ष मागील अनेक वर्षांपासून लढत आलाय. काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघांमध्ये असल्याने या मतदारसंघावर काँग्रेस पक्षाने दावा केला आहे.

काँग्रेसची ताकद किती?

याशिवाय लोकसभा मतदारसंघांमध्ये दलित मतदार  मोठ्या संख्येने असून या लोकसभा मतदारसंघात (Mumbai South Central Lok Sabha) दलित उमेदवार चेहरा असावा अशी प्रकारे काँग्रेसची भूमिका आहे. या लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा केली जात आहे. या लोकसभा मतदारसंघात धारावीतून वर्षा गायकवाड आमदार आहेत. तर राज्यसभेवर काँग्रेस कडून पाठवण्यात आलेले खासदार चंद्रकांत हांडोरे सुद्धा याच लोकसभा मतदारसंघातून येतात. 

दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचा इतिहास काय? 

लोकसभा मतदारसंघाचा (Mumbai South Central Lok Sabha) इतिहास बघितला तर मागील दोन टर्म  शिवसेना शिंदे गटात असलेले राहुल शेवाळे या ठिकाणी खासदार आहेत, लोकसभा मतदारसंघात याआधी शिवसेनेच्या  मनोहर जोशी यांचा पराभव काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांनी केला होता. आता हा सगळा इतिहास बघता आणि सध्याची स्थिती बघता  शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी या लोकसभा मतदारसंघावर आपलाच उमेदवार निवडणूक लढवेल, असा आग्रह केला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Sushma Andhare : संजय राऊत हे आमच्यासाठी चिलखत, प्रकाश आंबेडकरांनी आधी 'या' प्रश्नांची उत्तरं द्यावीत; सुषमा अंधारेंचे धडाधड सवाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

PM Narendra Modi : सोनिया गांधींची तब्येत बिघडली...नरेंद्र मोदींनी पाठवलं होतं स्पेशल जेट!PM Modi Exclusive Interview : ट्रेनमधल्या फुकट्या प्रवाशांचे फोटो रेल्वे स्टेशनवर लावणारPallavi Saple Pune Special Report : 'ससून'मधील चोकळीवरुन पेटला वाद, पल्लवी सापळे यांना मविआचा विरोध?Chhagan Bhujbal Special Report : Chhagan Bhujbal यांची दोन वक्तव्य, राज्यात घमासान! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
हाय गर्मी... सूर्य आग ओकतोय, देशात 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?
हाय गर्मी... सूर्य आग ओकतोय, देशात 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?
Kalyan Crime : क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
धरण उशाला अन् कोरड घशाला; मुंबईजवळील 250 गावांत भीषण टंचाई, जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती
धरण उशाला अन् कोरड घशाला; मुंबईजवळील 250 गावांत भीषण टंचाई, जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती
Kalyani Nagar Accident : पुणे अपघातप्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत, आता पुढचा नंबर कुणाचा? 
Kalyani Nagar Accident : पुणे अपघातप्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत, आता पुढचा नंबर कुणाचा? 
Embed widget