एक्स्प्लोर

Avinash Jadhav Resignation: राज ठाकरेंनी एक फोन फिरवला अन् अविनाश जाधवांना पुन्हा कामाला लावलं, म्हणाले....

Raj Thackeray & Avinash Jadhav: राज ठाकरे यांनी जाधव यांना राजीनामा मागे घ्यायला सांगितला आहे. त्यामुळे अविनाश जाधव हे मनसेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी कायम राहणार आहेत.

मुंबई: विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) निराशाजनक कामगिरीनंतर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणाऱ्या अविनाश जाधव यांना राज ठाकरे यांनी पुन्हा कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी मनसेच्या (MNS) पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी याबाबतचे पत्र मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पाठवले होते. मात्र, यानंतर अवघ्या 24 तासांमध्ये अविनाश जाधव यांनी आपण राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. राज ठाकरे यांच्या आदेशाने मी पुन्हा जिल्ह्याध्यपदाचा कार्यभार स्वीकारत असल्याचे अविनाश जाधव यांनी म्हटले होते.

अविनाश जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. मी तुझा राजीनामा अमान्य केला आहे, ठाणे आणि पालघरची जबाबदारी मी तुला दिली आहे, पुन्हा स्वीकार आणि कामाला लाग, असे राज ठाकरे यांनी जाधव यांना सांगितले. त्यामुळे आता अविनाश जाधव यांनी पदभार स्वीकारुन पुन्हा कामाला सुरुवात केली आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेने जवळपास 128 जागांवर उभे केले होते. मात्र, एकाही जागेवर मनसेचा उमेदवार विजयी झाला नव्हता. ठाणे जिल्ह्यात अविनाश जाधव यांच्यासह मनसेचे 12 उमेदवार पराभूत झाले होते. ठाणे विधानसभा मतदारसंघात अविनाश जाधव हे भाजपच्या संजय केळकर यांना कडवी टक्कर देतील, अशी चर्चा होती. मात्र, संजय केळकर यांनी ठाण्यातून पुन्हा एकदा सहजपणे विजय प्राप्त केला. दरम्यान, विधानसभेतील पराभवानंतर मनसेचे पालघर विक्रमगढ तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांनी अविनाश जाधव यांच्यावर गंभीर आरोप केला होता. निवडणूक काळात जाधव यांनी पालघरमधील उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांना सहकार्य केले नाही, अशी तक्रार योगेश पाटील यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली होती. पक्षातील या अंतर्गत कुरबुरींमुळे अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, आता जाधव यांनी राजीनामा मागे घेतला. यावरुन आता आरोप होत आहेत. अविनाश जाधव यांनीच हे औटघटकेचे राजीनामानाट्य घडवल्याचा आरोपही केला जात आहे.

अविनाश जाधव राजीनामा देताना काय म्हणाले?

विधानसभा निवडणुकीत ठाणे व पालघर येथे पराभवाची जबाबदारी घेऊन मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. काम करताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असल्यास आपण मला माफ करावे, असे अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते.  

आणखी वाचा

अविनाश जाधव यांनी राजीनामा का दिला?; बाळा नांदगावकरांनी सांगितलं कारण, पालघरमधील अंतर्गत वादावरही बोलले!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime: कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
Egg Price : सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
Elephanta Boat Accident : मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :24  डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 24  डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Bhondekar : शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या राजीनामानाट्यानंतर यूटर्नTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24  डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime: कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
Egg Price : सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
Elephanta Boat Accident : मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
IPO Update : DAM Capital च्या आयपीओवर गुंतवणूकदारांचा पैशांचा वर्षाव, 81.88 पट बोली लागली, GMP कितीवर?
IPO Update : DAM Capital च्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांची रांग, GMP किती टक्क्यांवर? 
Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पोलिसांच्या तावडीत, हरिद्वार
लातुरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Embed widget