एक्स्प्लोर

Maharashtra Budget 2026: रामकाल पथ विकास प्रकल्प ते ओझर विमानतळाचा विस्तार, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना अर्थसंकल्पातून काय मिळालं? जाणून घ्या

Maharashtra Budget 2026: अर्थसंकल्पात नाशिक शहर आणि जिल्ह्यासाठी अनेक महत्त्वाच्या विकासकामांची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.

Maharashtra Budget 2026: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना आज (6 मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सादर होणारा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या अर्थसंकल्पात नाशिक शहर आणि जिल्ह्यासाठी अनेक महत्त्वाच्या विकासकामांची घोषणा करण्यात आली असून धार्मिक पर्यटन, पायाभूत सुविधा, उद्योग आणि शेती या सर्व क्षेत्रांमध्ये मोठ्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.

नाशिकच्या धार्मिक महत्त्वाला लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात असल्याने त्यांच्या विकासासाठी पाच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून त्र्यंबकेश्वर परिसराचा पर्यटन आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात विकास केला जाणार आहे.

Maharashtra Budget 2026: ‘रामकाल पथ’ विकास प्रकल्पाला गती 

याशिवाय नाशिकमधील महत्त्वाकांक्षी ‘रामकाल पथ’ विकास प्रकल्पाला गती देण्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे. रामायणकालीन वारसा आणि धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जातो. आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेऊन शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, वाहतूक आणि इतर आवश्यक कामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Maharashtra Budget 2026: नाशिक विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार 

पायाभूत सुविधांच्या दृष्टीने नाशिकसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. नाशिक विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार आणि टर्मिनलचे आधुनिकीकरण करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुमारे 1,000 कोटी रुपयांच्या रिंग रोड प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच नाशिकची पुणे आणि मुंबईशी जोडणाऱ्या महामार्गांच्या सहापदरीकरणावरही भर देण्यात येणार आहे, ज्यामुळे वाहतूक सुलभ होण्यास मदत होईल.

Maharashtra Budget 2026: 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा

शेती क्षेत्रासाठीही मोठी घोषणा करण्यात आली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ अंतर्गत सप्टेंबर 2025 पर्यंतचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयाचा मोठा फायदा नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष, कांदा आणि इतर पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना होणार असल्याचे मानले जात आहे. तसेच राज्य जलमाहिती केंद्र नाशिक येथे उभारण्याची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या केंद्राच्या इमारतीसाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. 

Maharashtra Budget 2026: नाशिक ‘ग्रोथ हब’ म्हणून विकसित होणार

मुंबई महानगराच्या धर्तीवर पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे ग्रोथ हब विकसित करण्याची योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि शहरी विकासाला मोठी चालना मिळणार आहे. 

आणखी वाचा 

Maharashtra Budget 2026: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; काय स्वस्त, काय महाग? A टू Z माहिती एका क्लिकवर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chitra Wagh: महिलांचा छळ करणारे 'लांडगे', एक-दोघांना ठेचलेच पाहिजे; नाशिक धर्मांतर प्रकरणावरून चित्रा वाघ संतापल्या
महिलांचा छळ करणारे 'लांडगे', एक-दोघांना ठेचलेच पाहिजे; नाशिक धर्मांतर प्रकरणावरून चित्रा वाघ संतापल्या
Jitendra Shelke Accident: अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
Devendra Fadnavis: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, अशोक खरात, नाशिक धर्मांतर प्रकरणाचा घेतला आढावा; पोलिसांना दिले 'हे' कडक निर्देश
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, अशोक खरात, नाशिक धर्मांतर प्रकरणाचा घेतला आढावा; पोलिसांना दिले 'हे' कडक निर्देश
Nida Khan : धर्मांतर प्रकरणातील मास्टरमाईंड निदा खानचं मुंब्रा कनेक्शन! फरार असताना मुंबईत डॉक्टरांची भेट; मेडिकल सर्टिफिकेट अन् विश्रांतीचा सल्ला, नेमकं काय घडलं?
धर्मांतर प्रकरणातील मास्टरमाईंड निदा खानचं मुंब्रा कनेक्शन! फरार असताना मुंबईत डॉक्टरांची भेट; मेडिकल सर्टिफिकेट अन् विश्रांतीचा सल्ला, नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान
Womens Reservation Bill Update : महिला आरक्षण विधेयक नामंजूरवर शिक्का, सरकारला मोठा धक्का
Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Jitendra Shelke Accident: अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी... राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला
आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी... राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला
Gold Silver Price: अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
LizLaz on Virat Kohli: किंग कोहलीनं फोटो लाईक करताच जर्मनीपासून भारतापर्यंत सोशल मीडियात एकच धुमाकूळ; अखेर त्या मादक माॅडेलनं मौन सोडलं! सूचक वक्तव्य करत म्हणाली..
किंग कोहलीनं फोटो लाईक करताच जर्मनीपासून भारतापर्यंत सोशल मीडियात एकच धुमाकूळ; अखेर त्या मादक माॅडेलनं मौन सोडलं! सूचक वक्तव्य करत म्हणाली..
Embed widget