मोठी बातमी : मंत्री कुठे आहेत, लाज वाटत नाही का? वडेट्टीवारांचा सभागृहात हल्ला, जयंत पाटील म्हणाले, उद्दामपणा योग्य नाही, उत्तरं देताना दादांची दमछाक
Maharashtra Vidhan Sabha Monsoon Session 2024: राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचे दिसून आले.
विधानसभेत नेमकं काय म्हणाले?
जयंत पाटील- सभागृहाचं कामकाज स्थगित करा, तसेच संबंधित खात्याच्या मंत्र्याला सभागृहात बोलवा..
विजय वडेट्टीवार- ग्राम विकास मंत्री खोटे बोलले. महिला बालकल्याण मंत्री कुठे गेलेत. कामकाज असून मंत्री नसतील तर कसे चालायचे?, मंत्र्यांना दम द्या...मी मध्ये बोलत असताना हे कसे काय खाली बसून बोलतात.
गिरीश महाजन- विरोधी पक्षनेते काय चालल आहे?
बाळासाहेब थोरात- ही काय पद्धत आहे का सभागृह चालवायची?
विजय वडेट्टीवार- अध्यक्ष महोदय मी काय या मंत्र्यांचे ऐकून बोलू...कोण लागून गेले हे मंत्री. मी यांचे ऐकायचे...तुम्ही आम्हाला शिकवू नका...मंत्री कुठे आहेत लाज वाटत नाही.
अजित पवार- विरोधी पक्ष नेते जे बोलतात ते ऐकून मला वाटत त्यांना बोलायचे नसेल.. असे नाही चालणार.
जयंत पाटील- उपमुख्यमंत्री म्हणतात की, मी मागण्या टाकतो...हा उद्दाम पणा योग्य नाही...एकच मंत्री उपस्थित आहेत.
अजित पवार- आम्ही विरोधी पक्ष नेत्याना विनंती केली, काही मंत्री नाहीत ते वरच्या सभागृहात उत्तर देतात...मी म्हणालो मी मुद्दे काढून घेतो...इतर मंत्री देखील उपस्थित आहेत...आम्हाला देखील कळतय..आमची विनंती आहे कामकाज सुरू करावे.
विजय वडेट्टीवार- मला अपेक्षा आहे पुढच्या तीन मिनिटात मंत्री येतील.
विजय वडेट्टीवार- मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात झडाणी नावाचे गाव आहे तिथे 640 एकर जमीन खरेदी केली गेली. गुजरातच्या जिएसटी प्रमुख आहे. त्यांनी जमीन विकत घेतली. सर्व नियम पायदळी तुडवले...करोडो रुपयांचा महसूल बुडवला...एवढी मस्ती आणि दादागिरी...पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहेत. आम्ही जेव्हा पत्र पाठवले तेव्हा महुसल विभागाने थातुर-मातुर उत्तर दिले. कुठलीही परवानगी दिली नाही...गुजरात जिएसटी चा आधिकारी आहे त्याच्यावर काय कारवाई होणार आहे..खेड आणि मावळच्या दोन प्रतांचे अधिकार काढले गेले.