एक्स्प्लोर

Prithviraj Chavan: शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन होणार की नाही, हे 'या' एका गोष्टीवर अवलंबून; पृथ्वीराज चव्हाणांचं महत्त्वाचं वक्तव्य

Maharashtra Politics: शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट हे दोन्ही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. पृथ्वीराज चव्हाण हे शरद पवारांच्या वक्तव्यावर काय म्हणाले?

पुणे: नजीकच्या काळात काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर शरद  पवार (Sharad Pawar) गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी भाष्य केले आहे. शरद पवार जे काही बोलत आहेत, ते राजकीय समीकरण अस्तित्त्वात येणार की नाही, हे सर्व ४ जूनच्या लोकसभेच्या निकालावर अवलंबून आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ते बुधवारी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. 

शरद पवार यांच्या ज्या वक्तव्याची चर्चा आहे, ती मुलाखत साताऱ्यात 4 मे रोजी झाली होती. त्यावेळी मी त्याठिकाणी होतो. तेव्हा शरद पवार यांनी म्हटले होते की, आगामी काळात अनेक छोटे पक्ष काँग्रेसला सहकार्य करु शकतात किंवा काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात. पण मला वाटतं की, हे सगळं 4 जूनच्या निकालानंतर स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकीत दिल्लीत जर इंडिया आघाडीचे सरकार आले आणि विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली तरच सत्तेत सामील होण्यासाठी अनेक छोटे पक्ष काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी करतील किंवा विलीन होतील. शरद पवार यांच्या या आकलनात तथ्य असले तरी या सर्व गोष्टी निकालावर अवलंबून आहेत. 4 जूनला कोणाचं सरकार येणार, यावर या गोष्टी ठरतील, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

शरद पवार यांना त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेसमध्ये विलीन होईल की नाही, असा प्रश्नही विचारण्यात आला होता. यावर त्यांनी म्हटलं होते की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत फारसे वैचारिक अंतर नाही. ते पुढे म्हणाले होते की, पक्षातील ज्येष्ठ सहकाऱ्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेईन. परंतु, लोकसभा निवडणुकीत राज्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गट आणि काँग्रेसला किती जागा मिळतात, यावर सर्व गोष्टी अवलंबून असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?

नजीकच्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक समन्वय राखून काम करतील.यापैकी काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचे हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात विलीन होतील, असा अंदाज शरद पवार यांनी वर्तवला. मग हाच निकष तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरचचंद्र पवार पार्टी या पक्षासाठी लागू होईल का, असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला. यावर पवार यांनी सांगितले की, मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी कोणताही फरक दिसत नाही, वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरुंची विचारसरणी मानणारे आहोत, असे शरद पवार यांनी 'द इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले.

आणखी वाचा

आगामी काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील, काहीजण विलीन होतील; शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSindhudurg : तळकोकणात जंगली हत्तींचा हैदोस, माड बागायत आणि फळपिकाची नासधूसCity 60 SuperFast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा : 19 May 2024Ware Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 08 PM : 19 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
पुणे अपघात, आरोपी वेंदातला 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसोबत काम; न्यायालयाने 'या' अटी व शर्तींवर दिला जामीन
पुणे अपघात, आरोपी वेंदातला 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसोबत काम; न्यायालयाने 'या' अटी व शर्तींवर दिला जामीन
Embed widget