एक्स्प्लोर

Sharad Pawar: आगामी काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील, काहीजण विलीन होतील; शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Maharashtra Politics: देशातील लोकसभा निवडणूक निर्णायक टप्प्यावर पोहोचली असताना शरद पवार यांनी एक महत्त्वपूर्ण भाकीत केले आहे. देशातील काही प्रादेशिक पक्ष आगामी काळात काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या आणखी जवळ जातील, तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) या वक्तव्यामुळे आगामी काळात विरोधकांच्या गोटातील काही पक्षांची पुर्नरचना होण्याचे संकेत मिळत आहेत. शरद पवार यांनी 'द इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केले.

या मुलाखतीत शरद पवार यांनी म्हटले की, पुढील दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत अधिक समन्वयाने काम करतील. यापैकी काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचे हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात विलीन होतील, असा अंदाज शरद पवार यांनी वर्तवला. मग हाच निकष तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरचचंद्र पवार पार्टी या पक्षासाठी लागू होईल का, असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला. यावर पवार यांनी सांगितले की, मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी कोणताही फरक दिसत नाही, वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरुंची विचारसरणी मानणारे आहोत, असे शरद पवार यांनी म्हटले.

मात्र, प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत एकत्र येण्याच्या प्रक्रियेबाबत मी आत्ताच काही सांगू शकत नाही. सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही. वैचारिकदृष्ट्या आमचा पक्ष काँग्रेसच्या जवळचा आहे. परंतु, आमच्या पक्षाबाबत कोणतेही पाऊल उचलताना किंवा रणनीती ठरवताना सामूहिक पद्धतीने निर्णय घेतला जाईल. पंतप्रधान मोदी यांच्याशी जुळवून घेणे किंवा त्यांचे विचार पचनी पडणे  हे आमच्यासाठी अवघड असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

शरद पवार यांनी प्रादेशिक पक्षांबाबत केलेले हे वक्तव्य अनेक अर्थांनी महत्त्वाचे मानले जात आहे. समाजवादी पक्ष, राजद, लोजप, वायएसआरसीपी, टीडीपी आणि भारत राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षांमध्ये जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे नेतृत्व हस्तांतरित होत असताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केले आहे. या प्रादेशिक पक्षांच्यादृष्टीने हा स्थित्यंतराचा काळ आहे. हे स्थित्यंतर सुरु असताना अनेक प्रादेशिक पक्षांचे प्रमुख भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकत आहेत किंवा त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होत आहे. परिणामी या प्रादेशिक पक्षांना अस्तित्वासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे.  अशा परिस्थितीत या पक्षांना एका मोठ्या छत्राखाली जाण्याची गरज वाटत आहे, जेणेकरुन त्यांना अस्तित्वाची लढाई लढता येईल. 

शरद पवार यांनी या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबाबतही भाष्य केले. शरद पवार यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे हेदेखील एकत्र काम करण्याच्या या प्रस्तावाबाबत सकारात्मक आहेत. समविचारी पक्षांसोबत काम करण्यासाठी ते तयार आहेत. मी गेल्या काही काळापासून त्यांची विचाराची पद्धत अनुभवली आहे, ते आमच्यासारखेच आहेत, असे शरद पवार  यांनी म्हटले. 

सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्रात सत्ताधारी भाजपविरोधात एक शक्तिशाली अंडरकरंट जाणवत आहे. उत्तर प्रदेशसारख्या देशातील इतर भागांमध्येही हा अंडरकरंट जाणवत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. 

आणखी वाचा

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील दोन पक्ष लोप पावणार, पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक-दोन नव्हे तर 11 खेळाडूंचा वाढदिवस, श्रेयस अय्यर कर्णधार, 'बर्थडे बॉईज'च्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये कोण कोण?
एक-दोन नव्हे तर 11 खेळाडूंचा वाढदिवस, श्रेयस अय्यर कर्णधार, 'बर्थडे बॉईज'च्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये कोण कोण?
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
निवडणुकीआधी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश, आता त्याच नेत्यानं गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
निवडणुकीआधी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश, आता त्याच नेत्यानं गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 06 December 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सCM N DCM at Chaitya Bhoomi : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमी येथे बाळासाहेबांना अभिवादनABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 06 December 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सPratap Sarnaik On Mahayuti : प्रताप सरनाईक मंत्रिपदासाठी इच्छूक! शिवसेनेला १४ मंत्रिपदांची अपेक्षा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक-दोन नव्हे तर 11 खेळाडूंचा वाढदिवस, श्रेयस अय्यर कर्णधार, 'बर्थडे बॉईज'च्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये कोण कोण?
एक-दोन नव्हे तर 11 खेळाडूंचा वाढदिवस, श्रेयस अय्यर कर्णधार, 'बर्थडे बॉईज'च्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये कोण कोण?
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
निवडणुकीआधी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश, आता त्याच नेत्यानं गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
निवडणुकीआधी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश, आता त्याच नेत्यानं गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
'पुष्पा 2: द रुल'मधला 'हा' क्लासी सीन कमावून देणार 2000 कोटी; VIDEO पाहून तुम्ही स्वतःला शिट्ट्या वाजवण्यापासून रोखू शकणार नाही
'पुष्पा 2: द रुल'मधला 'हा' क्लासी सीन कमावून देणार 2000 कोटी; VIDEO पाहून क्रेझी झाली ऑडियन्स
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
Embed widget